Viral : देसी जुगाड करून महिलेनं ‘असा’ पकडला साप, आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केला Poisonous Snake Video

| Updated on: Feb 06, 2022 | 3:07 PM

Poisonous snake video : केरळ(Kerala)मधील तिरुवनंतपुरम(Thiruvananthapuram)चा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला कट्टकडा (Kattakada) परिसरातून एक भयानक साप (Snake) पकडताना दिसत आहे.

Viral : देसी जुगाड करून महिलेनं असा पकडला साप, आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केला Poisonous Snake Video
विषारी सापाला पकडताना महिला वनाधिकारी
Follow us on

Poisonous snake video : केरळ(Kerala)मधील तिरुवनंतपुरम(Thiruvananthapuram)चा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला कट्टकडा (Kattakada) परिसरातून एक भयानक साप (Snake) पकडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या महिलेने देसी जुगाड लावून हा जंगली साप पकडला आहे. या मादी सर्प पकडणाऱ्याचे नाव रोशनी आहे. IFS अधिकारी सुधा रमणदेखील महिलेच्या साप पकडण्याच्या शैलीने खूप प्रभावित झाल्या आहेत. IFS अधिकारी सुधा रमन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून रोशनीचा साप पकडण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की रोशनी या धाडसी महिला वन कर्मचाऱ्याने कट्टकडा येथील मानवी वस्तीतून एक धोकादायक साप पकडला. रोशनी ही साप पकडण्यात माहीर आहे. देशभरातील वनविभागात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

बुद्धिमत्तेचे कौतुक

रोशनी या वन कर्मचारी आहे. रोशनी यांचा साप पकडतानाचा 45 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक रोशनी यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत. त्यांनी कापडी पिशवीच्या सहाय्याने साप पकडला आहे. त्यांनी ही कापडी पिशवी सापासमोर अशारितीने ठेवली, की साप बिळ समजून त्यात घुसला. त्यामुळे सर्पदंशाचा धोका संपला.

व्हिडिओ पाहून लोकांनी म्हटले धाडसी

व्हिडिओला एवढा पसंती दिली जात आहे, की त्याला आतापर्यंत 45 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांनी त्यांना धाडसी म्हटले आहे. विशेष म्हणजे जगात सापांच्या 2000हून अधिक प्रजाती आढळतात. यापैकी केवळ 100 प्रजातींचे साप विषारी आहेत. त्यामुळे साप पाहिल्यानंतर अनेकजण घाबरतात.

Viral : स्वत:वरच का भुंकतोय हा कुत्रा? Cute Puppy Video पाहून तुम्हालाही हसायला येईल!

Animal Jugaad : शेळी आणि गाढवाचा अनोखा जुगाड? टीमवर्क पाहून म्हणाल, कोणतंही काम अवघड नाही! Video Viral

Video : रस्ता ओलांडण्यास हत्तींना येत होती अडचण; मग रेल्वे मंत्रालयानं तत्परतेनं केलं काम, नेटिझन्सकडून कौतुक