जुगाड करून बनवलंय लाकडी वॉशिंग मशीन! पाहून वाटेल, “आपल्याकडेही असावं असंच!”

जुगाडतंत्र खूप ठिकाणी अवलंबलं जातं. वॉशिंग मशीन मध्ये कुणी जुगाड करू शकतं का? हा जुगाड बघा. तुम्ही कधी लाकडी वॉशिंग मशीन पाहिलंय का? हे मशीन बाहेर फिट केलंय. विशेष म्हणजे हे एका टोपलीपासून बनवलं आहे. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघाल. जुगाड करणं ही एक कला आहे. यात लावलेली शक्कल बघून तर तुम्हाला मजाच येईल.

जुगाड करून बनवलंय लाकडी वॉशिंग मशीन! पाहून वाटेल, आपल्याकडेही असावं असंच!
washing machine
| Updated on: Sep 09, 2023 | 8:04 PM

मुंबई: पैसे वाचवून जर कुठलं काम होत असेल तर हरकत काय आहे? शक्कल लढवणे, पैसे वाचवणे आणि कमी गोष्टींमध्ये आपलं काम काढून घेणे याला म्हणतात जुगाड! जुगाड करण्यासाठी डोकं लागतं आणि आपल्या भारतात हुशार लोकांची कमी नाही. जुगाड तंत्र आपल्याकडे खूप चालतं. अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात. जुगाडू व्हिडीओ आपल्यालाच काय मोठमोठ्या लोकांना सुद्धा तितकेच आवडतात, ही लोकं असे व्हिडीओ रिपोस्ट करतात आणि आपल्यापर्यंत पोहचवतात. याआधी आपण पंख्याचा जुगाड पाहिला, सीसीटीव्हीचा जुगाड पाहिला, कन्स्ट्रक्शन साईट वर कामगारांनी स्वतःच काम सोपं जावं त्यासाठी केलेला जुगाड पाहिला. आज असाच एक जुगाड समोर आलाय जो आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत उपयोगाचा आहे. काय आहे हा जुगाड? बघुयात!

लाकडी वॉशिंग मशीन

हा व्हिडीओ बघा, यात वॉशिंग मशीन आहे. आता तुम्ही म्हणाल वॉशिंग मशीनचं काय विशेष ती तर सगळ्यांकडे असते? पण ही मशीन सगळ्यांना हवीहवीशी वाटेल. ही मशीन जुगाड तंत्राने बनवलीये. लाकडी वॉशिंग मशीन आणि तेही घराबाहेर! किती छान, हो ना? हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. घरात मशीन ठेवायचं म्हणजे कुठे ठेवायचं, मग त्याला जागा शोधा, सगळा विचार करा. इतकं सगळं करेपर्यंत मशिनच जर अशी असेल जी बाहेर फिट होऊ शकते तर?

मशीन जोरात फिरतंय

हे मशीन ज्याने बनवलं आहे त्याने प्रचंड डोकं लावलंय. लाकडी टोपली आहे त्यात कपडे टाकलेत. ही टोपली गोल-गोल मशीन सारखी फिरते. बघताना असं वाटतं हे लाकडी वॉशिंग मशीन आहे. एका बाजूने पाणी येऊन ते त्या टोपलीत जातं, ती टोपली गोल फिरते. कपडे नीट स्वच्छ धुतले जात आहेत की नाही माहित नाही पण मशीन मात्र जोरात फिरतंय. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल.