AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईचं 1BHK मायक्रो हाऊस! बघून चक्कर येईल, Video Viral

South Bombay मधील घरे विकत घेताना माणूस दहा वेळा विचार करत असावा, सामान्य माणूस तर विचारच करत नसावा इतकी किंमत या घरांची असते. खूप किंमत देऊन पण जर समाधान मिळत नसेल तर? कोटींनी किंमत आणि एवढुसं घर! यावरच एक रील प्रचंड व्हायरल होतेय, लोक हे बघून पोट धरून हसतायत. बघा हा व्हायरल व्हिडीओ.

मुंबईचं 1BHK मायक्रो हाऊस! बघून चक्कर येईल, Video Viral
1bhk flat mumbaiImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 09, 2023 | 5:19 PM
Share

मुंबई: अनेक गोष्टींमुळे व्हायरल होणारी मुंबई आज एका 1BHK मुळे व्हायरल झालीये. मुंबईची लोकल, मुंबईत असणारी गर्दी, मुंबईची होणारी तुंबई आणि मुंबईत अजिबात शिल्लक नसलेली जागा, जमीन हा सगळा नेहमीचा चर्चेचा विषय आहे. यावर अनेक रिल्स, व्हिडीओज बनवले जातात की कशी मुंबईत गर्दीच गर्दी झालेली आहे. मुंबईत घरं कशी आहेत, किती लहान आहेत. बरं… घरं लहान असूनसुद्धा त्याची किंमत किती जास्त आहे याचे तर अक्षरशः मिम्स बनतात. स्वप्ननगरी म्हणल्यावर महागाई आलीच. इथे एक-एक स्क्वेअर फिटचा पैसे द्यावा लागतो. जरा एरिया वाढला की पैसे वाढतात. तसं मुंबई आणि उपनगरांत घरं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच पण यातही जसजसं आपण जुनी मुंबई, नवी मुंबई अशा ठिकाणी जातो घरांची किंमत तसतशी बदलत जाते. यावरही सामान्य माणसं रिल्स बनवतात.

साऊथ बॉम्बेचा 1BHK फ्लॅट

तुम्हाला ते फेसबुकचे व्हिडीओ लक्षात आहेत का ज्यात एक माणूस घर दाखवतो? समजा तुम्हाला एखादं नवं घर घ्यायचं असेल तर एखादा ब्रोकर ज्या पद्धतीने घर दाखवतो अशा पद्धतीचे व्हिडीओ आता आजकाल फेसबुकवर दिसून येतात. याच पद्धतीने ब्रोकरची नक्कल करत एका मुलाने व्हिडीओ बनवलाय. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. हा मुलगा यात साऊथ बॉम्बेचा 1BHK फ्लॅट कसा असतो ते दाखवतोय.

View this post on Instagram

A post shared by SUMIT PALVE (@me_palve)

1BHK फ्लॅट 2.5 कोटी रुपयांना

व्हिडीओच्या सुरवातीला हा मुलगा प्रेक्षकांना नमस्कार करतो. त्याच्या मागे मागे हा कॅमेरा जातो, हा मुलगा या 1BHK मधला हटके असणारा मास्टर बेड, किचन, बाथरूम दाखवतो. हे सगळं तो उपरोधिकपणे दाखवतो. मग प्रेक्षकांना घेऊन वरच्या मजल्यावर जातो, टेरेस दाखवतो. हे सगळं दाखवताना तो फ्लॅटचं इतकं कौतुक करतो की बास. हा मजेशीर व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल. साऊथ मुंबई मध्ये घरांची किंमत प्रचंड आहे. पण इतकी किंमत भरून सुद्धा बदल्यात काय मिळतं हे हा मुलगा या व्हिडीओमध्ये सांगतोय. व्हिडीओमध्ये दाखवला जाणारा हा 1BHK फ्लॅट 2.5 कोटी रुपयांना असल्याचं तो सांगतोय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.