Fuljhadi Making Video : दिन दिन दिवाळी.. लहान-मोठ्यांना,सर्वांना आवडणारी ‘फुलबाजी’ कशी बनते ? हा Video पहाच
Diwali Viral Video : दिवाळीतील फुलबाजी कशी तयार होते, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची प्रोसेस अगदी सविस्तर दाखवण्यात आली आहे. पण ही प्रोसेस अतिशय जोखमीची देखील असते. कारण जरासं दुलर्क्ष केलं तरी आग लागू शकते, जीवावर बेतू शकतं. फुलबाजी फॅक्टरीचा मेकिंग व्हिडीओ..

दिवाळीचं अखेर आगमन झालं असून आजपासून आठवडाभर आता सणाची रेलचेल सुरू असेल. सणं येताच मार्केटची चमकही वाढते. दिवाळी म्हणजे नवे कपडे, फराळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फटाके. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच फटाक्यांचं आकर्षण असतात, ते आवडतात. त्यात बऱ्याच लोकांना आवडणारा फटाका म्हणजे ‘फुलबाजी’ (Phuljhari), त्यामुळे फटाक्यांची शोभा वाढते. तुम्हीही अनेक वेळा तुमच्यासाठी किंवा घरातील लहान मुलांसाठी फुलबाजी विकत घेतली असेलच ना. पण ही चमचमणारी, फुलबाजी अखेर बनते कशी (How Phuljhari Made In India) हे तुम्हाला माहीत आहे का ?
सध्या सोशल मीडियावर फॅक्टरीत बनणाऱ्या फुलबाज्यांचा एक व्हिडीओने अनेकांचं (Phuljhari Making Video) लक्ष वेधून घेतलं आहे. या चमचमत्या फटाक्यांचं मेकिंग पाहून कोट्यावधी युजर्स अगदी दंग झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामवर @thefoodiehat या नावाच्या अकाऊंटने फुलबाजी मेकिंगचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये काही मजूर पारंपारिक पद्धीतने आणि जोखीम घेऊन फुलबाजी कसे बनवतात, तेही रेकॉर्ड झाले आहे.
कशी बनते फुलबाजी ?
सर्वात पहिले एक खतरनाक केमिकल मिक्श्चर तयार केलं जातं, त्यामध्ये ॲल्युमिनिअम पावडर, बोरिक ॲसिड आणि ऑक्सीडायजर सारखे बरेच ज्वलनशील पदार्थ असतात. त्यानंतर अगदी पातळ तारांच्या साच्यात ठेवून त्यांना का जाडसर मिश्रणात बुडवलं जातं, मग ते उन्हात वाळवलं जातं.
याच प्रक्रियेची दोनदा पुनरावृत्ती केली जाते, जेणेकरून त्या फुलबाजीबमध्ये गनपावडर योग्य प्रमाणात साठली जाईल. अखेर त्या फुलबाज्या एका खोक्यात पॅकबंद करून मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार होतात. पण या व्हिडीओमध्ये फुलबाजी मेकिंग जेवढं साधं सोपं , सरळ वाटतं तेवढं ते खचितच नाहीये. कारण हे काम करताना जराही दुर्लक्ष झालं तर आग लागू शकते, मोठी दुर्घटना होऊ शकते.
View this post on Instagram
एवढच नव्हे तर व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की फॅक्टरीतील कामगार कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय किंवा हातमोजांशिवाय हे धोकादायक काम करत आहेत. त्यांची एकाग्रता आणि कठोर परिश्रम पाहून सोशल मीडिया युजर्स अगदी आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि 14 लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. त्यावर विविध कमेंट्स करून लोकांनी त्या मजुरांचे कौतुक तर केले आहेच, पण कोणतीही सुरक्षा नसताना, किंवा मोजे वगैरे न घालता केलेलं हे काम पाहून सुरक्षेविषयी प्रश्नही उपस्थित केलेत.
VIDEO : निरागस हरणाला अजगराचा जबर विळखा, प्राण कंठाशी आले, पण तेवढ्यात..
