
गेल्या काही वर्षांपासून सामान्य नागरिकांना स्वस्त दरात अनेक गोष्टी उपल्बध करून देणाऱ्या डी-मार्ट हे प्रचंड लोकप्रिय होत चालले आहे. डी-मार्टमध्ये अनेक गोष्टींवर मोठी सवलत मिळते.

पण अनेकांना माहिती नाही की डी-मार्टमध्ये ऐवढे स्वस्त सामान विकून देखील त्यांना मोठा फायदा होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की डी-मार्टच्या बाहेर लिंबू-मिरची का लावलेली दिसत नाही.

कारण ही लिंबू-मिरची दराबाहेर लावण्याची प्रथा ही मुख्यत्वे घर, छोटे दुकान किंवा वाहनांसाठी असते.

मात्र, डी-मार्टसारख्या मोठ्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये अशा पारंपारिक पद्धतींचा अवलंब कमी असतो. त्यामुळे तिथे सुरक्षा आणि इतर नियम पाळले जातात.

सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डी-मार्टची संख्या वाढली आहे. कारण ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व गोष्टी स्वस्तात मिळत असल्याने ग्राहक देखील प्रचंड गर्दी करतात.