
सोशल मीडियावरील प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहून नेहमीच हसु फूटते. असे व्हिडीओ खूपच व्हायरल होतात आणि पाहणाऱ्यांना गुदगुल्या करतात आणि चांगले मनोरंजन करतात. व्हिडीओत कधी माकडे माणसांची नक्कल करताना दिसतात. तर मांजरी आणि कुत्रे आपल्या खोड्यांनी धमाल करतात. अशात आता एक कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यास पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.या व्हिडीओत एक कुत्रा कासवाची नक्कल करताना दिसत आहे.त्याने कासवाची अशी नक्कल केली की पाहणाऱ्यांना हसु आवरणे कठीण होत आहे.
व्हीडीओत तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा कसे कासवा सारखे चालायला सुरु करतो. कासव नेहमीप्रमाणे हळूहळू आपल्या अंदाजात चालत आहे.त्याला पाहून कुत्र्याने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुत्राही लागलीच कासवाला त्याच्या प्रमाणे जमीनीवर अंग टाकून सरपटत चालून दाखवत असताना दिसत आहे. तसेच पाहिले तर कुत्रे पटकण कोणतीही गोष्ट शिकतात. परंतू कोणाला पाहून त्याची नक्कल करण्यचा हा कुत्र्याचा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. कुत्र्याची ही अजब नक्कल पाहून कोणालाही हसू येऊ शकते.
या मजेशीर व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्वीटर) वर @naturelife_ok नावाच्या आयडीने शेअर केले आहे. केवळ २९ सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत १.७ दशलक्ष म्हणजे १७ लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तर एक लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. अनेकांनी या व्हिडीओ मजेशीर प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.
येथे पाहा व्हिडीओ –
Puppy thinks he’s a turtle..🐶 😊 pic.twitter.com/NFdrLyhtga
— Nature & Animals🌴 (@naturelife_ok) September 11, 2025
या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हा व्हिडीओ ट्रेंड होत आहे. एका युजरने लिहिलेय की, कुत्र्याने तर कासवाच्या एक्टींगमध्ये ऑस्कर जिंकले आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिलेय की असं वाटतंय याने कासवा संगे जास्त वेळ घालवल्याने त्याचा परिणाम त्याच्यावर झाला आहे. तर एका युजरने यास जनावरांची कॉमेडी क्लास म्हटले आहे. तर एकाने लिहिलेय की हे खूपच मनमोहक आहे. जनावरांद्वारे कोणाची नक्कल करणे वास्तवात बुद्धीमत्तेचे प्रतिक आहे.