मुलीच्या बिछाण्यावर वळवळतोय खतरनाक साप, घरचे व्हिडीओ बनवण्यात मश्गूल : Viral Video
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात एक मुलगी बिछाण्यावर झोपलेली आहे. तिच्याजवळ एक साप हळूहळू सरपटत येत आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या सापाची शेपटी या मुलीने तिच्या छातीशी कवटाळली आहे.

सापाचे नाव जरी घेतले तरी थरकाप उडतो. कारण सापाचा दंश इतका भयनाक असतो की त्याने चावले तर खेळच संपतो, माणसाच्या वाचण्याचा चान्स खूपत कमी असतो.त्यामुळे या विषारी जनावरापासून माणूस दूरच रहाण्याचा प्रयत्न करतो. परंतू समजा कोणा मुलीच्या बिछान्या शेजारी साप सरपटत असेल आणि घरातले त्याला हटवण्याच्या एवजी त्याचे मोबाईलवर चित्रण करत असतील तर त्याला काय म्हणावे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटीजन्स या मुलीच्या पालकांवर खूपच टीका केली आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की मुलगी कशी बिछान्यावर झोपलेली आहे. आणि तिच्या शेजारी एक काळा साप हळूहळू सरपट आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या सापाची शेपटी या मुलीने स्वत:च्या छातीशी लावलेली आहे. तिचे धाडस पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
या व्हिडीओला पाहून प्रत्येक जण चिंता व्यक्त करत आहे. आणि ही चिंता व्यक्त करणे योग्यच आहे. परंतू याची सत्यता काही औरच आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @snakemasterexotics नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. या अकाऊंटच्या प्रोफाईल पाहिले असता कळते की हा साप पाळीव आहे. आणि या मुलीकडे सापाचे मोठे कलेक्शन आहे. तिच्या घरातील सर्वजण सरपटणाऱ्या प्राण्यांना पाळतात आणि त्यांचे म्युझियम चालवतात. त्यामुळे या मुलीला या सापाची भीती वाटत नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
६ सप्टेंबर रोजी शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ५.५ लाखाहून अधिक वेळा पाहिलेले आहे. याच्या कमेंट सेक्शनवर समिश्र प्रतिक्रीया आलेल्या आहेत. काही जण तिच्या आई-वडीलांचा निष्काळजीपणाला दोष देत आहेत. एका युजरने कमेंट केले आहे की, कोणी आई-वडील याची परवानगी कशी देऊ शकतात. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की मुर्खपणाचा कळस आहे. व्यूजसाठी मुलीचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही असेही काहींनी म्हटले आहे.अन्य एका युजरने म्हटले आहे की सापांचा स्वभाव दंश करण्याचा असतो. ते कोणत्याही क्षणी मुलीला नुकसान पोहचवू शकतात.
