Dussehra 2025 : शस्त्र पूजा ते रावन दहन, पूजेसाठीची शुभ वेळ कोणती?

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, दसऱ्याच्या दिवशी पूजा, मंत्रांचा जप, तसेच श्री राम आणि माता दुर्गेची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र ही पूजा करण्यापूर्वी तुम्हाला काही शुभ मुहुर्त माहिती असणे गरजेचे आहे.

Dussehra 2025 : शस्त्र पूजा ते रावन दहन, पूजेसाठीची शुभ वेळ कोणती?
| Updated on: Oct 02, 2025 | 3:33 PM

Dussehra 2025 : दसरा हा सण वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक असलेला महत्त्वाचा सण आहे. यंदा २ ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जात आह. याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला होता. तसेच दुर्गा मातेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, दसऱ्याच्या दिवशी पूजा, मंत्रांचा जप, तसेच श्री राम आणि माता दुर्गेची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र ही पूजा करण्यापूर्वी तुम्हाला काही शुभ मुहुर्त माहिती असणे गरजेचे आहे.

दसऱ्याच्या दिवशी पूजेसाठी काही विशेष शुभ मुहूर्त दिलेले आहे. जर तुम्ही या वेळेत पूजा केली तर तुम्हाला तुमच्या पूजेचे विशेष फळ मिळते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर श्री राम आणि माता दुर्गा यांची मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी. त्यांना चंदन, अक्षता, फुले, धूप आणि दीप अर्पण करावेत. या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी ‘ॐ विजयायै नमः’ आणि ‘ॐ रां रामाय नमः’ या मंत्रांचा जप करणे अत्यंत शुभ फलदायी ठरते. या पूजेने घरात सुख-समृद्धी येते आणि सर्व संकटे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

मुहुर्त काय?

ब्रह्म मुहूर्त सकाळी ०४:५३ ते ०५:४१ पर्यंत
प्रातः संध्या – सकाळी ०५:१७ ते ०६:२९ पर्यंत
अभिजीत मुहूर्त – दुपारी १२:०४ ते १२:५१ पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी ०२:२७ ते ०३:१५ पर्यंत
गोधूलि मुहूर्त – सायंकाळी ०६:२६ ते ०६:५० पर्यंत

रावण दहन आणि शस्त्र पूजा मुहूर्त

रावण दहन दरवर्षी प्रदोष काळात केले जाते. या रावण दहनाचा कार्यक्रम साधारण सूर्यास्तानंतर पार पडतो. हिंदू पंचांगानुसार २ ऑक्टोबर रोजी सूर्यास्त सायंकाळी ०६ वाजून ०५ मिनिटांनी होईल. यानंतर रावण दहन करता येईल.

तसेच शस्त्र पूजनासाठी विशेष शुभ वेळ दुपारी ०२:०९ वाजल्यापासून ०२:५६ वाजेपर्यंत असेल. या वेळेत तुम्ही आपले शस्त्र, अवजारे किंवा कामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची पूजा करू शकता. ज्यामुळे कार्यसिद्धी प्राप्त होते.

हेही वाचा : Dussehra 2025 Wishes : उत्सव विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा…; दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा