#Earthquake : भूकंपानंतर आला महापूर पण Memesचा! ‘हा कधी झाला?’ म्हणत सोशल मीडियावर उडवताहेत खिल्ली

| Updated on: Feb 18, 2022 | 1:47 PM

Jaipur Earthquake : ट्विटरवर #Earthquake हॅशटॅग ट्रेंड करत आहे. यूझर्स वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स (Memes) शेअर करत आहेत, जे अत्यंत मजेदार (Funny) आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जयपूरच्या वायव्येस 92 किमी अंतरावर होता.

#Earthquake : भूकंपानंतर आला महापूर पण Memesचा! हा कधी झाला? म्हणत सोशल मीडियावर उडवताहेत खिल्ली
जयपूर भूकंपानंतर सोशल मीडियावर शेअर होताहेत मीम्स
Follow us on

Jaipur Earthquake : राजस्थानमधील जयपूरसह काही भागात शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 08.01 वाजता हे धक्के जाणवले, मात्र त्याची तीव्रता फार नव्हती. पण तरीही लोक घाबरून घाईघाईने घराबाहेर पडले. सीकरमधील देवगड येथे भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. त्याचा परिणाम जयपूरसह फतेहपूरमध्येही जाणवला. दरम्यान, ट्विटरवर #Earthquake हॅशटॅग ट्रेंड करत आहे. भूकंपाचे धक्के सहन केल्यानंतर आता लोकांना मजा येत आहे. ट्विटर यूझर्स वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स (Memes) शेअर करत आहेत, जे अत्यंत मजेदार (Funny) आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जयपूरच्या वायव्येस 92 किमी अंतरावर होता. त्याचवेळी, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 एवढी होती.

हॅशटॅगसह मजेदार मीम्स

जयपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना सोशल मीडियावर लोक विनोद करत आहेत. लोक #Earthquake या हॅशटॅगसह मजेदार मीम्स शेअर करत आहेत. बरेच लोक म्हणतात, की हे धक्के कोणाला जाणवतात, कोणीतरी आम्हाला याबद्दल सांगावे. कारण, आपल्याला त्याची माहितीही नसते. चला तर मग बघू या निवडक मीम्स…

…तरीही उडवली खिल्ली

या महिन्याच्या 5 तारखेला जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याचा परिणाम दिल्ली-एनसीआरपर्यंत दिसून आला. मग लोकांच्या घरातील भिंती, साहित्य हादरले. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावर लोकांनी त्याची खिल्ली उडवली.

आणखी वाचा :

Cat dog video : कुत्रा तुपाशी, मांजर उपाशी! ‘असा’ लगावला ‘मौके पे चौका’ की नेटिझन्स म्हणतायत, हा तर Smartdog!

ही वधू नव्हे..! मग आहे तरी कोण? ‘ही’ बातमी सविस्तर वाचा आणि Viral झालेला ‘हा’ Video पाहा…

Bhuban Badyakar पोहोचला पॅरिसमध्ये..! ‘Kacha Badam’ गाण्यावर कसा केला तरुणाईनं Dance? पाहा, Viral Video