
जंगलाचा राजा सिंह (Lion) आहे असं म्हणतात, सिंहीणींचं (Lionesses) वर्चस्वही कमी नाही. खरं तर एकंदरीत वर्चस्व पाहता सिंहीणींनी हत्तीला कधीच चितपट करायला हवं. पण जंगलात काहीही होऊ शकतं. हत्ती एक महाकाय प्राणी आहे आणि त्याने याचाच फायदा का म्हणून घेऊ नये? जंगलाचा एक नियम आहे, इथे कोण कोणावर भारी पडेल, याबाबत काही सांगता येत नाही. तब्बल 14 सिंहिणींनी हत्तीवर हल्ला करतात पण छोटासा हत्ती घाबरत नाही. शांत राहून, संयमाने तो संकटावर मात करतो. व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video) खूपच अनोखा आहे, जो पाहून तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीत ताकदवर बाजूचा विजय होईल असं नाही. संयमाने माणूस ताकदवर गोष्टींसमोर देखील लढू शकतो. व्हिडिओ पाहा, ज्यात हत्तीने सिंहिणीशी ज्या प्रकारे स्पर्धा केली ती कौतुकास्पद आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तब्ब्ल 14 सिंहीणींनी हत्तीच्या मुलाला चारही बाजूंनी घेरले आहे. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की, सगळ्यांनी मिळून त्याला बळीचा बकरा बनवलंय. दोन-तीन सिंहिणी हत्तीवर चढून त्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. आता बघा ना एवढासा तो हत्ती त्याच्यावर त्या सिंहीणी चढतात तर तो घाबरणार असं ज्या क्षणी वाटतं त्याच क्षणी हत्ती न घाबरता गोल गोल फिरू लागतो. अजिबात घाबरत नाही. छोटा गजराज अडचणीच्या वेळी मन लावून काम करतो, ज्यामुळे सिंहीण त्याच्या अंगावरून खाली सुद्धा पडतात. त्यानंतर तो पाण्याच्या दिशेने धावतो पण सिंहिणी त्याला सोडत नाही. हत्ती तिथून पाण्याच्या दुसऱ्या बाजूला जायला लागतो आणि सिंहिणी त्याच्याकडे पाहतच राहते.
Lone tusker takes on 14 lionesses & wins…
Who should be than king of forest ?
Via Clement Ben pic.twitter.com/kYbZNvabFv— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 27, 2022
हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांना खूप आवडलाय. व्हिडीओ प्रचंड शेअर केला जातोय. याच कारणामुळे अनेक युजर्स व्हिडिओवर आपला फिडबॅक देत आहेत. हत्तीच्या बळामुळे सिंहीण अपयशी ठरल्याचं एका युझरने म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एका युझरने लिहिले की, जंगलात काहीही होऊ शकतं, काहीही सांगता येत नाही.