Viral : 11 वर्षाच्या मुलानं परदेशात खरेदी केली जमीन, कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल; वाचा सविस्तर

| Updated on: Mar 16, 2022 | 11:46 AM

Landlord boy : आपल्या नावे जमीन असावी, घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. एका छोट्या मुलाने ही किमया करून दाखवली आहे. Arnaldur Kjárr Arnþórsson या मुलाचे वय 11 वर्षे आहे. तो आइसलँडमधील रेकजाविक (Reykjavík) येथे राहतो.

Viral : 11 वर्षाच्या मुलानं परदेशात खरेदी केली जमीन, कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल; वाचा सविस्तर
जमीन खरेदी करणारा अकरा वर्षाचा Arnaldur Kjárr Arnþórsson
Image Credit source: Instagram
Follow us on

Landlord boy : आपल्या नावे जमीन असावी, घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. एक छोटे घर घेण्यासाठी आयुष्यभराची कमाई खर्च होते. पण एका छोट्या मुलाने ही किमया करून दाखवली आहे. Arnaldur Kjárr Arnþórsson या मुलाचे वय 11 वर्षे आहे. तो आइसलँडमधील रेकजाविक (Reykjavík) येथे राहतो. आपल्या नावापुढे ‘लॅण्डलॉर्ड’ ही पदवी असावी, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने स्कॉटलंडमध्ये जमीन खरेदी केली आहे. Arnaldur Kjárr Arnþórsson म्हणाला, की आता मला लोकांना ‘लॉर्ड’, लॉर्ड Arnaldur Kjárr Arnþórsson म्हणायला सांगण्याचा अधिकार आहे. ‘आइसलँड मॉनिटर’ने दिलेल्या माहितीनुसार, या 11 वर्षांच्या मुलाने स्कॉटलंडमधील अर्दालीजवळ जमिनीचा एक तुकडा विकत घेतला आहे. जो 5 चौरस फूट आहे. त्याची किंमत सुमारे 3 हजार रुपये आहे. या मुलाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की आपण हे सर्व ‘लॅण्डलॉर्ड’ या उपाधीसाठी केले आहे. मात्र, त्याच्या देशात (आईसलँड) (Iceland) त्याला विशेष महत्त्व असणार नाही. मात्र ते मजेदार असणार आहे.

मित्र जुन्याच नावाने हाक मारतात

त्याचे मित्र अजूनही या मुलाला त्याच्या नावाने हाक मारतात. कोणताही मित्र त्याच्यासमोर लॉर्ड नाव लावत नाही. पण त्याला स्कॉटलंडमध्ये राहायचे आहे जेणेकरून लोक त्याला ‘लॉर्ड’ म्हणतील. Arnaldur Kjárr Arnþórsson याला रॅग डॉल्सचे व्हिडिओ पाहिल्यानंतर जमीन खरेदी करण्याची कल्पना सुचली. जो स्वतःला लॉर्ड म्हणवतो, कारण त्याने स्कॉटलंडमध्ये जमीन खरेदी केली. यानंतर त्याने गुगलवर सर्च केले, जिथे मुलाला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जमीन खरेदीवर 80 टक्के सूट मिळाली.

करार योग्य वाटला

त्याला हा करार योग्य वाटला कारण त्याला स्वतःला लॉर्ड म्हणवण्याची संधी सोडायची नव्हती. यानंतर मुलाने आपल्या वडिलांना Arnþór Snær Sævarsson यांना याबद्दल संदेश पाठवला. त्यानंतर वडिलांनीही स्कॉटलंडमध्ये जमीन खरेदी करण्यास होकार दिला आणि आपल्या मुलाला आर्थिक मदत केली. मुलाची आई, Elísabet Ólafsdóttir म्हणाली, की तिला खात्री नव्हती, की कोणीतरी तिच्या मुलाला लॉर्ड म्हणेल.

आणखी वाचा :

Photo : ‘…तर मला विमानातून फेकून द्या’, वडा पावच्या फोटोची ‘ही’ पोस्ट होतेय Viral

Presence of mind असावा तर ‘असा’; पाण्यातून असा रस्ता काढला, की लोक म्हणतायत, मुंबईकरांसाठी ‘ही’ भारी आयडिया | Video पाहा

VIDEO : अजब लग्नाची गजब गोष्ट, वरात पाहून लोक म्हणतात हेच आहे आयुष्याचे सत्य!