VIDEO : अजब लग्नाची गजब गोष्ट, वरात पाहून लोक म्हणतात हेच आहे आयुष्याचे सत्य!

VIDEO : अजब लग्नाची गजब गोष्ट, वरात पाहून लोक म्हणतात हेच आहे आयुष्याचे सत्य!
लग्नामध्ये वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: TV9

आपल्या देशामध्ये लग्न (wedding)  म्हटंले की, एक वेगळाच उत्साह असतो. लग्नात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी महिनाभर आधीच तयारीही केली जाते. वधू असो की वर, प्रत्येकजण लग्नाची तयारी (Wedding preparations) अगोदरच सुरू करतो आणि हा क्षण आणखी खास बनवण्यासाठी जास्त मेहनत घेतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 15, 2022 | 2:35 PM

मुंबई : आपल्या देशामध्ये लग्न (wedding)  म्हटंले की, एक वेगळाच उत्साह असतो. लग्नात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी महिनाभर आधीच तयारीही केली जाते. वधू असो की वर, प्रत्येकजण लग्नाची तयारी (Wedding preparations) अगोदरच सुरू करतो आणि हा क्षण आणखी खास बनवण्यासाठी जास्त मेहनत घेतात. मात्र, हे काहीही असले तरीही लग्नाची शोभा ही मित्र मंडळी आणि नातेवाईकांमुळेच येते. सध्या लग्नाच एक खास व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे.

आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या वेळी दोन लोक ढोल वाजवत रस्त्यावरून जात आहेत आणि त्यांच्या मागे घोडीवरून नवरदेव जात आहे. या लग्नाच्या वरातीमध्ये जेमतेम चार लोक दिसत आहेत. @PrasantIRAS नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 17 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बहुतेक पालकांनी आणि मित्रांनी या नवरदेवाच्या लग्नाच्या वरातीमध्ये जाणे टाळलेले दिसते आहे.

इथे पाहा खास वरातीचा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माझ्या आईची खूप आठवण आली.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘हा व्हिडीओ पाहून मला वाटते आहे की, ही लग्नाची मिरवणूक बहुतेक कोरोनाच्या काळातली आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हेच आहे आयुष्याचे सत्य…या व्हिडीओवर अनेकांनी कमेटं केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : तरूणाची खतरनाक स्टंटबाजी, नेटकरी म्हणाले व्हिडीओ पाहून पोटात गोळाच आला!

VIDEO : लग्न मंडपामध्ये येणाऱ्या नवरीला पाहून नवरदेवाला आली चक्कर, पुढे काय झाले पाहा व्हिडीओमध्ये!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें