VIRAL VIDEO | मोबाईलशिवाय कुटुंब एकत्र बसून जेवण करतात, महिलेचं निन्जा टेकनिक , लोक म्हणाले ‘हे सर्वोत्तम…’

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अनेकांनी निन्जा टेक्निक असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर केला आहे.

VIRAL VIDEO | मोबाईलशिवाय कुटुंब एकत्र बसून जेवण करतात, महिलेचं निन्जा टेकनिक , लोक म्हणाले हे सर्वोत्तम...
VIRAL VIDEO
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 18, 2023 | 12:28 PM

मुंबई : जर तुम्ही एका मध्यमवर्गीय (MIDDEL CLASS FAMILY) घरात मोठे झाला असाल, तर तुम्हाला सायंकाळी एकत्र बसून जेवणं करणं किती महत्त्वाचं आहे. हे लक्षात आलं असेल, अजून लोकं रात्री एकत्र जेवणं करतात. कारण जेवणं करीत असताना दिवसभरातील घडामोडींवरती (Trending news) गप्पा गोष्टी होतातं. त्याचबरोबर कुटुंबातील काही नियोजनाच्या गोष्टी तिथं होत असतात. त्यामुळे रात्रीचं जेवणं एकत्र होणं गरजेचं आहे. सध्याची मुलं मोबाईलवरती (MOBILE) अधिक गुंग असल्याची पाहायला मिळतं आहेत. त्याचबरोबर जेवताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं अनेकांना अजिबात चर्चा होत नाही. यामध्ये फक्त मुलांना दोष देऊन उपयोग नाही, तर त्यामध्ये अनेक आई-वडिलांचा सुध्दा दोष आहे. जेवण करीत असताना आई-वडिलांच्या हातात सुध्दा मोबाईल असतो.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. व्हिडीओ ट्विटरवरती ज्यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये एका आईची निन्जा टेक्निक असं म्हटलं आहे. जेवत असताना अनेकदा फेसबूक आणि इंस्टाग्रामवरती रील्स पाहण्यात अनेकजण व्यस्त असतात, त्यामुळे अनेकांना जेवण करीत असताना त्यांना डिस्टर्ब होतं. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक फॅमिली आपले मोबाईल एका जागेवर जमा करीत आहे. त्यानंतर ते जेवण करतात असं दिसून आलं आहे.

हा व्हिडीओ 1 लाख 72 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला अधिक साऱ्या प्रतिक्रिया सुध्दा आल्या आहेत. काही लोकांनी कमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, एका व्यक्तीने सगळ्या लोकांना कशा पद्धतीने एकत्र ठेवलं आहे. काही लोकांनी असं म्हटलं आहे की, त्या आईला मुलांना इतक्या लवकर सोशल मीडियावर येऊन द्यायचं नाही.


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांना जे व्हिडीओ आवडतात तेचं व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल होतात असं पाहायला मिळालं आहे.