पोलिसाने शेतकऱ्याचा जीव वाचवला! व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक शेतकरी जमिनीवर पडलेला दिसतोय.

पोलिसाने शेतकऱ्याचा जीव वाचवला! व्हिडीओ व्हायरल
police performs cpr
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 22, 2022 | 3:40 PM

अचानक मृत्यूच्या घटना वाढल्यात. हार्ट अटॅक किंवा कार्डिॲक अरेस्टमुळे होणारे मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहेत. डान्स करताना, जिममध्ये व्यायाम करताना किंवा धावताना अचानक मृत्यू झाल्याचे व्हिडिओही समोर येतायत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक शेतकरी जमिनीवर पडलेला दिसतोय. खरं तर या शेतकऱ्याला हार्ट अटॅक आलाय, व्हिडीओमध्ये दिसणारा पोलीस त्याचा जीव वाचवतायत.

हे प्रकरण आंध्र प्रदेशातील आहे. येथील महा पदयात्रा आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला.

दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी तिथे जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला. यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्परता दाखवत शेतकऱ्याकडे धाव घेतली.

यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याची छाती दाबायला सुरुवात केली. शेतकऱ्याचा श्वास सामान्य होईपर्यंत ते सीपीआर करत राहिले.

आंध्र प्रदेश पोलिसांचे सर्कल इन्स्पेक्टर (सीआय) रहेमेंद्रवर्म असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

या घटनेचा हा व्हिडिओ आहे ज्यात पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने आपले कौशल्य दाखवून शेतकऱ्याचा जीव कसा वाचवला हे दाखवण्यात आले आहे. आंध्र प्रदेश पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.