Lionel messi: बापरे! खरंय का हे? Messi ने अश्रू पुसण्यासाठी जो Tissue Paper वापरला त्याची किंमत खरंच इतकी?

ज्या टिश्यू पेपरने त्याने अश्रू साफ केले त्या टिश्यू पेपरची किंमत किती होती?

Lionel messi: बापरे! खरंय का हे? Messi ने अश्रू पुसण्यासाठी जो Tissue Paper वापरला त्याची किंमत खरंच इतकी?
Lionel Messi tissue price
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 20, 2022 | 5:30 PM

फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत लाखो लोकांना वेड लावलं. मेस्सी हा एक फुटबॉल खेळाडू आहे जो जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही कोणत्या ना कोणत्या खेळाडूचे चाहतेही असालच. आता मेस्सीचे इतके फॅन आहेत की सहाजिकच अनेक चाहत्यांसाठी त्याच्या अश्रूंचा एक एक थेंब खूप मौल्यवान आहे. लिओनेल मेस्सीने बऱ्याच काळानंतर ऑगस्ट 2021 मध्ये बार्सिलोना फुटबॉल क्लब सोडला. त्यावेळी तो खूप भावूक झाला. पण तुम्हाला माहितेय का ज्या टिश्यू पेपरने त्याने अश्रू साफ केले त्या टिश्यू पेपरची किंमत किती होती? हा किस्सा तेव्हाही जबरदस्त व्हायरल झाला होता आणि आताही या गोष्टीची जबरदस्त चर्चा आहे. या टिश्यूची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ऑगस्ट 2021 मध्ये बार्सिलोना फुटबॉल क्लबमधून बाहेर पडल्याची घोषणा करताना मेस्सी भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला टिश्यू पेपर दिला.

या टिश्यू पेपरने मेस्सीने अश्रू आणि नाक पुसले. त्यावेळी या टिश्यू पेपरची किंमत कोट्यवधी रुपये असू शकते, असे कोणालाही वाटले नसेल.

लिओनेल मेस्सीने पत्रकार परिषद घेऊन बार्सिलोना क्लबमधून बाहेर पडल्याची घोषणा केली. मेस्सीच्या एका चाहत्याने हाच टिश्यू पेपर हातात जपून ठेवला होता.

रिपोर्ट्सनुसार, मेसीने वापरलेल्या टिश्यू पेपरची मर्काडो लिब्रे वेबसाईटवर विक्री केली जात होती. जिथे या कागदाची किंमत दहा लाख डॉलर म्हणजे जवळपास 8 कोटी रुपये ठेवण्यात आली होती.

लिओनेल मेस्सी 2004-05 मध्ये बार्सिलोनामध्ये सामील झाला. त्याने 1 मे 2005 रोजी सीनियर संघासाठी पहिला गोल केला. यानंतर 24 जून रोजी त्याने बार्सिलोनासोबत सीनियर खेळाडू म्हणून करार केला.