New Year 2023: अतिशय सुंदर दृश्य! अंतराळातून दिसलेला 2023 चा पहिला सूर्योदय, चुकवू नका

| Updated on: Jan 02, 2023 | 8:18 PM

हे दृश्य इतकं सुंदर आहे, सूर्योदय पाहताना लोक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेत.

New Year 2023: अतिशय सुंदर दृश्य! अंतराळातून दिसलेला 2023 चा पहिला सूर्योदय, चुकवू नका
2023 sunrise video
Image Credit source: Social Media
Follow us on

जागेचा एक सुंदर क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अचंबित करणारा क्षण जपानचा अंतराळवीर कोइची वाकाटा याने ट्विटरवर पोस्ट केला आणि या व्हिडिओचं वर्णन ‘चमत्कारिक क्षण’ असं केलंय. वास्तविक अंतराळातून दिसणारा 2013 सालचा हा पहिला सूर्योदय आहे, जो अंतराळवीराने कॅमेऱ्यात कैद केलाय.हा व्हिडीओ त्याने जगासोबत शेअर केलाय. हे दृश्य इतकं सुंदर आहे, सूर्योदय पाहताना लोक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेत.

सूर्याची तेजस्वी चमक या क्लिपमध्ये पाहायला मिळते. अंतराळवीराने अंतराळाचे सुंदर दर्शन जगाशी शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक अंतराळवीरांनी असे क्षण जनतेसोबत शेअर करत आले आहेत.

अंतराळवीर कोईची वाकाटा, @KIBO_SPACE यांनी 1 जानेवारी रोजी ट्विटरवर हा नेत्रदीपक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले- मानवी इतिहासात प्रथमच हा चमत्कारिक क्षण आहे जेव्हा नवीन वर्षाची सुरुवात आणि अंतराळातील सूर्योदयाचे दृश्य पाहायला मिळत आहे.

या क्लिपला 3,90,000 हून अधिक व्ह्यूज आणि जवळपास 3,000 लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो युझर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. काहींनी याला धक्कादायक दृश्य म्हटलं, तर कुणी किती सुंदर आहे ते सांगितलं.

सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS) कार्यरत असलेले अंतराळवीर कोइची यांनी अमेरिका, युरोप आणि रशियातील अंतरीक्ष यात्रींसह नव्या वर्षाचे स्वागत केले.