AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुलीची करामत, ‘या’ प्रँकमुळे प्रसिद्ध शेफची उडाली तारांबळ, व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध शेफ गॉर्ड रॉमसे हेसुद्धा प्रँकचे शिकार झाले आहेत. त्यांच्या मुलीमुळे त्यांची चांगलीच धांदल उडाली. (funny prank video chef gordon ramsay)

Video | मुलीची करामत, 'या' प्रँकमुळे प्रसिद्ध शेफची उडाली तारांबळ, व्हिडीओ व्हायरल
शेफ रॉमसे यांच्यासोबत अशा प्रकारे प्रँक करण्यात आला.
| Updated on: Mar 20, 2021 | 9:42 PM
Share

मुंबई : सध्याचं युग हे समाजमाध्यमांचं युग आहे. सोशल मीडियाच्या जोरावर एका क्षणामध्ये अनेकजण सेलिब्रिटी झाले आहेत. प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रँकच्या मदतीने अनेकजण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून समोर आले आहेत. प्रसिद्ध शेफ गॉर्ड रॉमसे हेसुद्धा प्रँकचे शिकार झाले आहेत. त्यांच्या मुलीमुळे त्यांची चांगलीच फसगत झाली आहे. (funny prank video of chef Gordon Ramsay goes viral)

गॉर्डन रॉमसे हे जगप्रसिद्द शेफ आहेत. पाककलेचे त्यांचे अनेक टिव्ही शोज तुम्ही पाहिले असतील. त्यांच्याच मुलीने रॉमसे यांच्यासोबत एज जबरदस्त प्रँक केला आहे. या प्रँकचा व्हिडीओ रॉमसे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच, रॉमसे यांची झालेली फजिती पाहून सगळ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रसिद्ध शेफ गॉर्डन रॉमसे यांच्या मुलीने त्यांच्यासोबत केलेल्या पँकचा हाच तो व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Gordon Ramsay (@gordongram)

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

रॉमसे यांच्या मुलीने त्यांच्यासोबत चांगलाच प्रँक केला आहे. बॉटलमध्ये कोबंडीचे अंडे टाकण्याच्या बाहाण्याने रॉमसे यांची मुलगी टिली रॉमसे हिने चांगलाच कारनामा केलाय. तिच्या हातात एक कोंबडीचे अंडे आहे. त्या अंड्याला घेऊन जादू दाखवण्याचा बहाणा करत ती रॉमसे यांना बॉटलजवळ बोलावते. रॉमसे यांनी बॉटलजवळ तोंड नेताच, त्यांच्या मुलीने बॉटल खालून जोराद दाबलीये. त्यानंतर चेहऱ्यावर पाणी पडल्यानंतर रॉमसे चांगलेच गोंधळले. त्यानंतर लगेच मुलीने दुसऱ्या हातातील अंडे रॉमसे यांच्या चक्क डोक्यावर फोडले. या प्रकारानंतर मात्र रॉमसे यांची चांगलीच धांदल उडालीये. नेमकं काय करावं हे त्यांना समजत नाहीये.

दरम्यान, हा प्रँक झाल्यानंतर रॉमसे यांनी स्वत:हून हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकला. त्यानंतर हा प्रँक बघून जगभरात अनेक प्रतिक्रिया आल्या. रॉमसे यांच्या फजीतीमुळे अनेकजणांना हसू आवरले नाही. सोशल मीडियावर अपलोड करताच, हा व्हीडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

इतर बातम्या :

VIDEO | वॉटर सफारीची मजा लुटणारा प्राणी, मनमोहक व्हिडीओने लक्ष वेधलं

VIDEO : मलायकाचा जबरदस्त डान्स, हजारो चाहत्यांकडून दाद

Video | कोरोना लस घेतल्यानंतर आनंद कसा होतो पाहायचंय?, मग हा मजेदार व्हिडीओ नक्की पाहा

(funny prank video of chef Gordon Ramsay goes viral)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.