‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’, हे गाणं गणपतीला अधिक वाजणार

सध्या सगळीकडं गणपतीच्या खरेदीची गर्दी पाहायला मिळत आहे. लोकं आतापासून मुंबईतल्या महत्त्वाच्या बाजारपेठेत गरजेचं असलेलं साहित्य खरेदी करीत आहेत. प्रत्येकवर्षी एक गाण व्हायरल होतं.

आमच्या पप्पांनी गणपती आणला..., हे गाणं गणपतीला अधिक वाजणार
ganapati song viral
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2023 | 2:49 PM

मुंबई : सप्टेंबर महिन्यात सगळीकडं गणपतीची (ganpati festival 2023) लगबग पाहायला मिळते. महाराष्ट्रात गणेशोत्सव (ganeshotsav 2023) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुशंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुध्दा केली जाते. मुंबईतल्या काही भागात गणेश मंडळ आतापासून गणपतीच्या तयारी गुंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येकवर्षी आपल्याला कपड्याची वेगळी फॅशन पाहायला मिळते. त्याचबरोबर अनेक गाणी या दरम्यान रिलीज सुध्दा होतात. सोशल मीडियावर अनेकदा गणेशोत्सवा दरम्यान अनेक गाणी व्हायरल झाली आहेत. सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ हे लहान मुलाच्या आवाजातील गाणं सोशल मीडियावर चांगलचं (ganapati song viral) व्हायरल झालं आहे. अनेकांच्या तोंडात हेचं गाणं ऐकायला मिळत आहे. त्यामुळे हे गाणं व्हायरल होण्याची शक्यता अधिक आहे.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती चर्चा

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ हे गाणं एकवर्षापुर्वी माऊला प्रोडक्शनकडून रिलीज करण्यात आलं होतं. हे गाण युट्यूबला तीन मिलीयन लोकांनी पाहिलं होतं. सध्या हे गाणं पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आलं आहे. त्या गाण्याचे सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती रिल्स व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. पण सध्या या गाण्याची अधिक चर्चा असल्यामुळे हे गाणं नक्की चर्चेत येईल असं म्हटलं जातं आहे.

असे आहेत गाण्याचे बोल

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक लहान मुलगा दिसत आहे. तो मुलगा ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती…, हे गाणं म्हणतोय

त्या मुलाचं अधिक कौतुक

त्या मुलाने शाळेची कपडे घातली आहेत. त्या मुलाचं वय सुध्दा खूप कमी आहे. त्या मुलाच्या डोक्याला टिळआ लावला आहे. त्याचबरोबर त्या मुलाने आयकार्ड सुध्दा घातलं आहे. त्या मुलाची अॅक्टिंग चांगली असल्यामुळे हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. लोक त्या मुलाची अधिक तारिफ करीत आहे.