भूत, प्रेत की आणखी काही? ज्यांनी -ज्यांनी झाडाचा हा Video पाहिला त्यांची भीतीनं गाळण उडाली

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्या व्हिडीओमुळे लोकांच्या मनात भीती आणि अश्चर्याचे भाव एकाच वेळी निर्माण झाले आहेत.

भूत, प्रेत की आणखी काही? ज्यांनी -ज्यांनी झाडाचा हा Video पाहिला त्यांची भीतीनं गाळण उडाली
Image Credit source: Social media X, @_Dibyanshu73
| Updated on: Aug 03, 2025 | 6:41 PM

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्या व्हिडीओमुळे लोकांच्या मनात भीती आणि अश्चर्याचे भाव एकाच वेळी निर्माण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक विशालकाय झाड वादळामध्ये असं हलताना दिसत आहे, जसं की एखादा मोठा राक्षस पुन्हा एकदा जंगलामध्ये आला असावा असा भास होतो. हे झाड वादळाच्या तडाख्यामध्ये सापडल्यामुळे अशाप्रकारे हालत आहे, की हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क होत आहेत.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावर कमेंट्स आणि लाईकचा पाऊस पडत आहे. एका युजर्सने यावर प्रतिक्रिया देताना मजेदार कमेंट केली आहे. आता जंगालामध्ये आरामात फिरणं देखील अवघड झालं आहे. या व्हिडीओमुळे जंगलांमध्ये अजूनही भूत, प्रेताची दहशत असल्याचा भास मनामध्ये निर्माण झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. हे झाडं वादळाच्या तडाख्यामध्ये सापडलं आहे. हे झाडं मुळ, खोडापासून ते शेंड्यापर्यंत अशा प्रकारे हालत आहे की, या जंगालामध्ये एखादा महाभयानक राक्षस नाचत असावा असा भास होत आहे. हे झाडं ज्याप्रकारे वादळात हालत आहे, ते पाहून या झाडामध्ये दुसऱ्या एखाद्या जिवाने प्रवेश केला आहे, असा पाहाणाऱ्याचा भास होतो. हा व्हिडीओ ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यातील अनेकांची भीतीमुळे गाळण उडाली आहे. यातील एका युजर्सने म्हटलं की, हा प्रसंग जर रात्रीच्या वेळी घडला असता तर अनेकांचा भीतीमुळे जीव देखील जाऊ शकला असता.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर सोशल मीडियामधून काही मजेशीर कमेंट केल्या जात आहेत, एकाने म्हटलं की, हा प्रसंग जर रात्री कोणी पाहिला असता तर त्याचा भीतीमुळे जीव गेला असता, तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, या झाडाखाली बसून जो अभ्यास करेल तो टॉपर नाही तर टेररिस्ट बनेल. हा व्हिडीओ @_Dibyanshu73 नावाच्या ट्विटर हँडल्सवरून शेअर करण्यात आला आहे.