Video : बॉयफ्रेंडला घरी बोलवलं, नंतर केलं पेटीमध्ये बंद, पुढे घडलं असं काही की…भयंकर प्रकाराने खळबळ!

Viral : कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला चक्क लोखंडी पेटीत 45 मिनिटे कोंडून ठेवले होते. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

Video : बॉयफ्रेंडला घरी बोलवलं, नंतर केलं पेटीमध्ये बंद, पुढे घडलं असं काही की...भयंकर प्रकाराने खळबळ!
UP BF
Image Credit source: X
| Updated on: Jan 24, 2026 | 9:58 PM

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला चक्क लोखंडी पेटीत 45 मिनिटे कोंडून ठेवले होते. समोर आलेल्या माहितीनुसार प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी भेटायला बोलावले होते. दोघेही घरात गप्पा मारत असताना अचानक प्रेयसीची काकू तिथे आली. तिला पाहून प्रेयसी घाबरली आणि प्रियकर सापडला जाऊ नये म्हणून तिने त्याला घरात असलेल्या एका मोठ्या लोखंडी पेटीत लपवले आणि बाहेरून कुलूप लावले.

प्रियकराला पेटीत कोंडले

काकूने तिला विचारले की आत कोण होते?, यावरून मुलीचे आपल्या काकूशी भांडण केले. त्यानंतर तिची आई आणि भाऊदेखील तिथे पोहोचले. घरच्यांनी त्या तरुणाला संपूर्ण खोलीत शोधले, पण तो सापडला नाही. त्याच वेळी त्यांना पेटीच्या आतून काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. मुलीने पेटीची चावी देण्यास नकार दिल्यावर घरच्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. कुलूप तुटत नसल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीकडून पेटीची चावी घेऊन कुलूप उघडले, तेव्हा आतून तिचा प्रियकर बाहेर आला. पोलिसांनी दोघांनाही चौकीत नेले.

दोघांची चौकशी सुरू

जेव्हा पेटीतून तरुण बाहेर आला, तेव्हा घरच्यांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला वाचवले. संतापलेल्या घरच्यांनी मुलीलाही पोलिसांच्या ताब्यात दिले आणि म्हणाले की, “हिलाही घेऊन जा आणि तुरुंगात टाका, कारवाई केल्याशिवाय दोघांना सोडू नका.” चकेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय प्रकाश मिश्र यांनी सांगितले की, मुलगा त्याच गल्लीत राहणारा असून त्याचे घर मुलीच्या घरापासून सात घरे सोडून आहे. सध्या दोघांची चौकशी सुरू असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

दरम्यान, ही घटना चकेरी पोलीस स्टेशन परिसरात घडली. शुक्रवारी सकाळी मुलीचा मोठा भाऊ ट्रॅक्टर घेऊन शेतात निघून गेला, तर तिची आई एका कारखान्यात कामावर गेली होती. त्यानंतर मुलीने तिच्या प्रियकराला फोन करून घरी बोलावले होते. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता तिचा प्रियकर दुचाकीवरून तिच्या घरी आला. मात्र त्याचवेळी मुलीची काकू तिथे आल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे.