GK: सिंह 20 तास का झोपतो ? हत्तींच्या कळपाचे नेतृत्व हत्तीणच का करते ?

केनियातील मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमधून जंगलातील प्राण्याच्या अजब कहाण्या समोर आल्या आहेत. सिंह दिवसाचे 20 तास का झोपतो आणि हत्तीण का त्यांच्या कळपाचे नेतृत्व करते वाचा...

GK: सिंह 20 तास का झोपतो ? हत्तींच्या कळपाचे नेतृत्व हत्तीणच का करते ?
| Updated on: Dec 28, 2025 | 9:03 PM

केनियातील मसाई मारा नॅशनल रिझर्व्ह जगातील सर्वात रोमांचक आणि समृद्ध जंगल म्हणून ओळखले जाते. वाईल्ड लाईफ एक्सपर्ट अजय दुबे यांच्या मते मसाई मारा प्राणी संग्रहालय येथील गवताची भूमी, नागमोडी नद्या आणि अद्भूत जैवविधतेसाठी ओळखले जाते. यामुळे येथील हिंस्रप्राण्यांचे वागणे आणि ‘द ग्रेट मायग्रेशन’सारखे नैसर्गिक चमत्कार स्पष्टपणे दिसतात. या जंगलात मोठ्या संख्येने सिंह, चित्ते, बिबटे, हत्ती , जिराफ आणि गेंडे आढळतात.

हत्तींच्या कळपाचे नेतृत्व हत्तीण का करते ?

आफ्रीका आणि आशियाई हत्तीतील फरक मोठा असतो. आफ्रीकन हत्ती आकाराने मोठे असतात. त्याची पाठ वाकलेली असते, कान खूपच रुंद असतात. मजेशीर गोष्ट म्हणजे आशियातील हत्तींमध्ये नरालाच सुळे असतात. तर आफ्रीकन हत्तीत नर आणि मादी दोघांनाही सुळे असतात. तसेच हत्तींच्या कळपाचे नेतृत्व केवळ हत्तीण ( मादी ) करते. कारण बुजुर्ग हत्तींणींकडे अनेक वर्षांचा अनुभव असतो. आणि ती संपूर्ण कळपाला सुरक्षित रस्ता दाखवते असे अजय दूबे सांगतात.

सिंह 20 तास का झोपतात ?

सिंहाच्या कळपात सर्वसाधारणपणे एक वा दोन नर सिंह, अनेक सिंहीणी आणि त्यांच्या मुलांचा समावेश असतो. शिकार बहुतांशी सिंहीणी करतात. कारण त्या चपळ असतात आणि सामुहिकरित्या शिकार तडीस नेतात. नर सिंह कळपाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतो.

सिंह जास्त वेळ का झोपतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अजय दुबे सांगतात की सिंह दिवसाचे 18 ते 20 तास आराम करतो. हा आराम आळसामुळे नाही तर ऊर्जा बचत करण्याची रणनिती आहे. शिकारीसाठी मोठी ताकद लागते. आणि आफ्रीकेतल्या उष्ण वातावरणात आराम करणे त्यांच्या जगण्यासाठी महत्वाचे आहे.

मसाई मारात ‘द ग्रेट मायग्रेशन’ हा देखील एक अद्भूत नजारा आहे. येथे लाखो विल्डबीस्ट आणि झेब्रा अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ लांबचा प्रवास करतात. या खुल्या इको-सिस्टीममुळे येथे 100 मीटरच्या घेऱ्यात सिंह, चित्ते आणि बिबट्यांना एकत्र पाहणे शक्य होते. मसाई माराचे जंगल केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर जीवन, संतुलन आणि संघर्षाची जीवंत पाठशाला आहे.