बकरीने पळवली सरकारी फाईल; लोक म्हणतात आता बकरीला कमिशनची प्रतिक्षा

| Updated on: Dec 06, 2021 | 6:15 AM

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या गैरजबाबदारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

बकरीने पळवली सरकारी फाईल; लोक म्हणतात आता बकरीला कमिशनची प्रतिक्षा
Follow us on

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या गैरजबाबदारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक बकरी तोंडात एक कागद घेऊन उभा असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर शेजारीच असलेल्या सरकारी ऑफीसमधून बकरी फाईल घेऊन पळाल्याचा आवाज येतो आणि तिला पकडण्यासाठी तीच्या पाठीमागून एक व्यक्ती धावत असल्याचे दिसून येते.

….तरीही कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही

बकरी सरकारी कार्यालयात घुसून फाईल तोंडात धरते, ती कार्यालयातून बाहेर देखील पडते, मात्र तोपर्यंत तिच्याकडे कोणाचेच लक्ष नसते. ती बाहेर पडल्यानंतर मात्र बकरी फाईल घेऊन गेल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते. त्यानंतर या बकरीला पकडण्यासाठी धावपळ उडते. मात्र तोपर्यंत ही बकरी तो कागद घेऊन पसार होते. तेथे उपस्थित असलेल्या एकाने हा व्हिडीओ चित्रित केला असावा, आता हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

52 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिला व्हिडीओ

दरम्यान हा व्हिडीओ आतापर्यंत 52 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून, कमेट्सचा पाऊस पडत आहे, यावर बोलताना एका युजरने थेट सरकारवर निशाणा साधला आहे. इथे सरकारी ऑफीसमधून बकरी कागदपत्र नेते तरी देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही आणि हे आम्हाला 1970 पूर्वीचे कागदपत्र मागत असल्याचे त्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, ही बकरी प्रचंड चतूर आहे. सरकारी अधिकाऱ्यांसारखीच दिसते, जोपर्यंत कमिशन भेटणार नाही तोपर्यंत ती काही फाईल देणार नाही.

 

संबंधित बातम्या

आनंद महिंद्रांनी शेअर केली कोचीमधील सुंदर छायाचित्रे, नेटकरी म्हणाले खरच केरळ ही देवाची भूमी

मी किंवा मटन दोघांपैकी एकाला निवड; पतीची पत्नीकडे अजब मागणी, बायकोने निवडले चक्क मटन

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस