अगं बाई पाणीपुरीचं कारंजं! असं कारंजं प्रत्येकालाच घरात ठेवायला आवडेल…

गोलगप्पा फाऊंटनचा हा फोटो शेअर करत लिहिले की, त्याला आयुष्यात हा कारंजा हवा आहे.

अगं बाई पाणीपुरीचं कारंजं! असं कारंजं प्रत्येकालाच घरात ठेवायला आवडेल...
Golgappa fountain
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 20, 2022 | 5:43 PM

गोलगप्पा म्हणजेच पाणीपुरी लव्हर्ससाठी एक खास फोटोसमोर आलाय. आता त्यांना पाणीपुरीच्या पाण्यासाठी फार भटकावे लागणार नाही. या फोटोतील विशेष गोष्ट म्हणजे यात एक कारंजा दिसतोय, त्यातून पाणीपुरीचं पाणी पडत आहे. हे पाणी पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणार. या कारंज्यांमधलं पाणी लोकं आपल्या पाणीपुरी मध्ये भरून खात आहेत.

खरंतर हा फोटो अनेक युजर्सनी सोशल मीडियावर शेअर केलाय. समर नावाच्या एका युझरने गोलगप्पा फाऊंटनचा हा फोटो शेअर करत लिहिले की, त्याला आयुष्यात हा कारंजा हवा आहे.

या चित्रात हा कारंजा सुंदर दिसत असून अनेक थरांत त्यातून गोलगप्पाचे पाणी खाली येत असल्याचे दिसून येते.

फोटोची गंमत म्हणजे यात एक हात दिसत असून त्या हातात एक गोलगप्पा दिसून येतोय. या कारंज्यातून पाणी घेतले जात आहे.

याशिवाय समोर एक महिलाही दिसत असून तिच्या हातात गोलगप्पा असून ती कारंज्यातून गोलगप्पाचे पाणी घेत आहे. त्याचे पाणीही पाहायला मजा येत आहे.

तसे तर गोलगप्पाचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडात पाणी येतं. फक्त तरुणी, महिला आणि मुलंच नाही तर प्रत्येक वर्गातील लोकांना गोलगप्पा खायला आवडतात.

रस्त्याच्या कडेला असलेली पाणीपुरीची गाडी पाहताच ती खाण्याचे मन सुरू होते. तुम्हालाही गोलगप्पा खाण्याची आवड असेल तर पाणीपुरीचा कारंजा बघून तुम्हालाही आनंद होईल.