ATM machine Of Idali: “ए गरमा गरम, गरमा गरम इडली ए!” ATM machine मधून निघणार इडली ए…

इडली प्रेमींसाठी एक खास बातमी आहे, तुम्हाला गरमागरम इडली देणारं एटीएमसारखं मशीन बनवण्यात आलंय. एक व्हिडिओ व्हायरल होतोय

ATM machine Of Idali: ए गरमा गरम, गरमा गरम इडली ए! ATM machine मधून निघणार इडली ए...
Idali ATM machine
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 16, 2022 | 12:27 PM

आजपर्यंत ATM मधून आपण फक्त आणि फक्त पैसे निघताना पाहिलेत. अर्थात ते मशीनच त्यासाठीच असतं म्हणा. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की आता एटीएम मधून इडली येणार तर? होय. इडली प्रेमींसाठी एक खास बातमी आहे, तुम्हाला गरमागरम इडली देणारं एटीएमसारखं मशीन बनवण्यात आलंय. एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक महिला इडली मशीनमधून इडली काढताना दिसतीये. भन्नाट आहेना हे?

खरंतर हा व्हिडिओ एका युझरने पोस्ट केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरुमध्ये एका स्टार्टअपने इडली बॉट अर्थात इडली एटीएम सुरू केलंय.

उद्योगपती शरण हिरेमठ आणि सुरेश चंद्रशेखरन यांनी ही इडली मशीन बसवलीये, ती स्टार्टअप फ्रेशॉट रोबोटिक्सची निर्मिती आहे.

शरण हिरेमठ काही वर्षांपूर्वी रात्री उशिरा आपल्या आजारी मुलीसाठी इडली खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते, परंतु कोणतेही रेस्टॉरंट उघडे नव्हते.

यानंतर त्यांना इडली मशीन बसवण्याची कल्पना सुचली. या कल्पनेवर त्यांनी प्रचंड काम केलं, खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी अनेक साधनसामग्रीही उभी केली.

अनेक ठिकाणी दुकानांमध्ये शिळ्या इडल्या दिल्या जात होत्या. सध्या दक्षिण भारतीय पदार्थ सर्व्ह करणारे हे मशीन पहिले ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन असल्याचा दावा केला जात आहे.

या सुविधेच्या माध्यमातून लोकांना गरमागरम इडलीचा आस्वाद घेता येतोय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, या मशीनवर लोकांच्या रांगा दिसतायत.