फक्त एक चित्रपट अन् इंडस्ट्रीपासून झाली दूर, आज 50,000,00,00,000 कोटींची मालकीण
करिअरमध्ये फक्त एक चित्रपट देणारी ही अभिनेत्री आज आहे 50000 कोटींची मालकीण. बनली बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक. कोण आहे ही अभिनेत्री?

Bollywood Actress : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी काही दिवसांमध्ये इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली. मात्र, प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा मार्ग निवडला. यामध्ये अशा एका अभिनेत्रीचे नाव आहे, जिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, तिने या चित्रपटानंतर चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे आज ही अभिनेत्री चित्रपटांपासून जरी लांब असली तर ती 50 हजार कोटींची मालकीण आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
कोण आहे ही अभिनेत्री?
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत, जिने 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारिकर यांच्या चित्रपट ‘स्वदेश’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच प्रेक्षकांना प्रचंड आवडला. इतकच नाही तर या चित्रपटाला ऑस्कर देखील मिळाला. गायत्रीचा दमदार अभिनयाने तिला रातोरात प्रसिद्ध झाली. शाहरुख खानसोबतची तिची जोडी पाहून ती पुढे इंडस्ट्रीमधील मोठी सुपरस्टार होणार असं देखील म्हटलं जातं होतं.
मात्र, पहिल्याच चित्रपटानंतर अभिनेत्री गायत्रीने चित्रपट इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. ‘स्वदेश’ हा तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर तिने एका वर्षानंतर म्हणजेच 2005 मध्ये उद्योगपती विकास ओबेरॉयसोबत लग्न केलं. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला.
गायत्री जोशी यांची एकूण संपत्ती किती?
गायत्री जोशीचा नवरा विकास ओबेरॉय हे भारतातील एक प्रसिद्ध रिअर इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे ओबेरॉय कन्स्ट्रक्शन नावाची एक मोठी कंपनी आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ही सुमारे 50000 हजार कोटी रुपये इतकी आहे. यामुळे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री जूही चावला यांची एकूण संपत्ती 7790 कोटी रुपये इतकी आहे. तर त्यांच्या नवऱ्याची एकूण संपत्ती 2 हजार कोटी रुपये इतकी आहे.
यामुळे गायत्री जोशी या बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री नसल्या तरी त्या इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहेत. सध्या त्या यशस्वी जीवन जगत आहेत.
