Hero Alom: बेसूर गातो म्हणून सोशल मीडिया स्टारला टाकले तुरुंगात! माफीनाम्यावर स्वाक्षरीही घेतली, नेटकरी संतापले

फेसबुकवर अलोमला सुमारे 20 लाख लोक फॉलो करतात. तसेच, यूट्युबवर त्याचे 14 लाखांहून अधिक सब्स्क्राइबर्स आहेत. गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणून तो बांगलादेशच्या सोशल मीडियात ओळखला जातो, त्याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.

Hero Alom: बेसूर गातो म्हणून सोशल मीडिया स्टारला टाकले तुरुंगात! माफीनाम्यावर स्वाक्षरीही घेतली, नेटकरी संतापले
Hero Alom Bangladesh Social Media StarImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 8:54 AM

Hero Alom: बांगलादेशातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी हिरो अलोम (Hero Alom) या नावाच्या व्यक्तीला बेसूर गातो म्हणून अटक केलीये. सोशल मीडियावर (Social Media) त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत, मात्र वाईट गाण्यासाठी पोलिसांनी त्याला पकडून मानसिक छळ केलाय. हिरो अलोम म्हणाले की, पोलिसांनी त्याला पुन्हा शास्त्रीय गाणे न गाण्याच्या सूचना दिल्यात. हिरो अलोम (37 वर्षे) असे त्याचे नाव आहे. फेसबुकवर अलोमला सुमारे 20 लाख लोक फॉलो करतात. तसेच, यूट्युबवर त्याचे 14 लाखांहून अधिक सब्स्क्राइबर्स (Youtube Subscribers) आहेत. गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणून तो बांगलादेशच्या सोशल मीडियात ओळखला जातो, त्याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र, या गाण्यांमुळेच त्याला अडचणींचा सामना करावा लागला.

माफीनाम्यावर स्वाक्षरी करायला लावली- हीरो अलोम

स्वतः हीरो अलोमने वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मला सकाळी 6 वाजता उचलले आणि 8 तास ताब्यात ठेवले. मी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी आश्वासन नजरुल इस्लाम यांची गाणी का गातो?” असे त्यांनी मला विचारल्याचे अलोमने सांगितले. पोलिसांनी मानसिक छळ केला. यासोबतच पुन्हा शास्त्रीय गाणी गाण्यासही मनाई करण्यात आली. याशिवाय माफीनाम्यावर स्वाक्षरीही करायला लावली, असे अलोम म्हणाला.

सोशल मीडियातून समर्थन

या प्रकरणाबाबत सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक यूजर्स अलोमच्या समर्थनार्थ उभे असल्याचे चित्र आहे. अलोमचे गायन वाईट असले तरीही नेटकऱ्यांनी याला वैयक्तिक अधिकारांवर हल्ला म्हटले, वाईट गातो म्हणून एखाद्याला तुरुंगात डांबणे चुकीचे आहे असे नेटकऱ्याचे म्हणणे आहे. एका युझरने हिरो अलोमच्या समर्थनार्थ लिहिले की, तू खरा हिरो आहेस. इतरांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. त्याचबरोबर आणखी एका युझरने लिहिले की, तसे पाहता मी तुमच्या गाण्यांचा आणि तुमच्या अभिनयाचा चाहता नाही. पण तुमचा आवाज दाबण्याचं काम झालं तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.