
पृथ्वीवर अजूनही अत्यंत रोमांचक ठिकाणं आहेत. जगाला माहीत नसलेल्या या जागा स्वर्गाहूनही अप्रतिम आहेत. अचानक अशा जागांचा शोध लागतो. त्यातील दृश्य पाहून आपण भारावून जातो. ही अज्ञात ठिकाणं लोकांसमोर आणणं हे एक चॅलेंज आहे. तसं ते अद्भूत कामही आहे. अशा जागांमधून इतिहास कळतो. पुरातन काळातील अनेक गोष्टी उजागर होतात. मानव संस्कृतीवर नवा प्रकाश पडतो. नवं संशोधन समोर येतं. अनेक युगाांपूर्वी या ठिकाणी राहत असलेल्या लोकांची माहिती समोर येते.
सोशल मीडियावर असे असंख्या इन्व्हेस्टिगेशन ग्रुप्स आहेत. हे लोक अशा जगाला शोधून जगासमोर आणत असतात. इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये राहणाऱ्या काही मित्रांनी ‘अंडरग्राऊंड बर्मिंघम’ नावाने इ्न्स्टाग्रामवर असंच एक अकाऊंट बनवून ठेवलं आहे. हे लोक अनेक शतकांपूर्वीच्या गुंफा शोधतात. बंकरमद्ये जातात. तिथली दुनिया पाहतात. त्याचं ऐतिहासिक महत्त्व पडताळून पाहतात आणि जगाला त्याची माहिती देतात.
बर्मिंघमच्या या ग्रुपने नुकतीच एक गुहा शोधली होती. या गुहेच्या आतील दृश्य मन मोहून टाकणारं होतं. आश्चर्यकारक होतं. या गुहेत पूर्वी कुटुंब राहत होतं याचं आश्चर्य वाटू लागतं. कारण या गुहेत सर्व सुख सुविधांच्या वस्तू होत्या. अख्खा संसार या गुहेत होता. त्यामुळे या गुहेचीही स्वत:ची म्हणून एक कहाणी समोर आली.
या ग्रुपमधील तरुण तरुणी जसजसे गुहेत शिरले तस तसे त्यांना आतील जग वेगळेच दिसू लागले. त्यामुळे त्यांना अधिकच आश्चर्य वाटू लागलं. गुहेत शिड्या होत्या आणि सुरुंगही होते. ते पाहून ही तरुणी अधिक आश्चर्यचकीत झाली. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. गुहेत फ्रिज दिसतंय. त्यात काही तरी ठेवलेलं दिसतंय. त्याच्याच बाजूला झोपण्याचीही जागा आहे. त्याशिवाय पाण्याची पाईपलाईनही गुहेत दिसतेय.
एवढ्या अरुंद आणि पाण्याने भरलेल्या गुहेत दुसरं जगही असू शकतं याची आम्हाला कल्पनाच करवत नाही, असं या तरुणीने म्हटलं. @undergroundbirmingham या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करून या ग्रुपने एक पोस्ट लिहिली आहे. आम्ही या गुहेत एका परिपूर्ण घराचा शोध लावला आहे, असं या पोस्टमंध्ये म्हटलं आहे. या पोस्टला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. तसेच या पोस्टला लाखो व्ह्यूजही मिळाले आहेत. हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजर्सने तर काय भारी घर आहे राव, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या यूजर्सने तर ओ साहेब, गुहेत तीन फ्लोर कसे? असा सवाल केला आहे.