Video : सकारात्मकतेचा झरा! ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशनआधी छवीचा डान्स, ‘ऑलवेज बी पॉझिटिव्ह’ म्हणत नेटकऱ्यांकडून व्हीडिओ शेअर
छवीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला यात ती डान्स करताना दिसतेय. छवीवर स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली. या शस्त्र क्रियेआधी तिने आपल्या इन्स्टाग्रामवर डान्सचा व्हीडीओ शेअर केला.

मुंबई : आपल्या आयुष्यातील निगेटिव्ह गोष्टींमधूनही काही सकारात्मक शोधून आनंदी राहिलं तर आपलं दुख: कमी होतं असं म्हणतात. असंच काहीसं हिंदी टीव्ही अभिनेत्री छवी मित्तल (Chhavi Mittal) हिच्याकडे पाहिल्यावर वाटतं. नुकतीच तिच्यावर स्तनाच्या कर्करोगाची (breast cancer) अखेर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. व्यायाम करताना छातीला दुखापत झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यास तिला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. मात्र ती या सगळ्याने खचून गेली नाही. तिने हिमतीने या प्रसंगाशी दोन हात केले. तिच्यावर शस्त्रक्रियेआधी तिने डान्स केला अन् त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकजण शेअर केला. तिचा हा डान्स सध्या अनेकांसाठी सकारात्मकतेचा झरा ठरतोय.
छवीचा व्हीडिओ
छवीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला यात ती डान्स करताना दिसतेय. छवीवर स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली. या शस्त्र क्रियेआधी तिने आपल्या इन्स्टाग्रामवर डान्सचा व्हीडीओ शेअर केला. हा व्हीडिओ अनेकांच्या पॉझिटिव्हिटीचा स्त्रोत ठरतोय. याला तिने तितकंच समर्पक कॅप्शन दिलं आहे. “डॉक्टर म्हणाले, छवी तुला रिलॅक्स राहण्याची गरज आहे. त्यामुळे मी असा डान्स करतेय. #preppingforsurgery”, असं तिने म्हटलंय.
हा व्हीडिओ सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. तिचा व्हीडिओ अनेकांनी शेअर करत सकारात्मकता असावी, तर अशी असं म्हटलंय. तिच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट करत तू खूपच पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलंय. ‘ऑलवेज बी पॉझिटिव्ह’ ,असं एकाने म्हटलंय
छवीने या शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास सहा तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. आता छवी कर्करोगमुक्त झाली आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर असह्य वेदना होत असल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं.
छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी ती अभिनेत्री आहे.