Video : समुद्रकिनारी सुंदर घर थाटलं होतं, लाटा आल्या पाहता-पाहता जमीनदोस्त, पाहा व्हीडिओ…

समुद्राच्या किनारी असलेलं हे घर अनेकांच्या स्वप्नातील महल आहे. अनेकांना असं आपलं घर असावं अशी इच्छा असते. लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे पडणाऱ्या घराचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

Video : समुद्रकिनारी सुंदर घर थाटलं होतं, लाटा आल्या पाहता-पाहता जमीनदोस्त, पाहा व्हीडिओ...
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: May 14, 2022 | 1:45 PM

मुंबई : समुद्र किनारी आपलं घर असावं, अशी अनेकांची इच्छा असते. असंच अनेकांच्या स्वप्नातील घराचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. पण हे स्वप्नवत घर आता जमीनदोस्त झालंय. त्याचं कारण आहे, समुद्राच्या लाटा. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना बीचवरील एक बीच हाऊस समुद्राच्या लाटांमुळे ज्या प्रकारे उद्ध्वस्त झालं. हा व्हीडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने हा व्हीडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना बीचवरील एक बीच हाऊस समुद्राच्या लाटांमुळे ज्या प्रकारे उद्ध्वस्त झालं. हा व्हीडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने हा व्हीडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

समुद्राच्या किनारी असलेलं हे घर अनेकांच्या स्वप्नातील महल आहे. अनेकांना असं आपलं घर असावं अशी इच्छा असते. लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे पडणाऱ्या घराचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. लाटांमुळे सध्या घराचा खालचा भाग कोसळला त्यानंतर ते घर पडलं. ते समुद्रात वाहून गेलं.

हेटेरस बेटाच्या बाहेरील भागात हे घर बांधण्यात आलं होतं. या घरात सध्या कुणी राहत नव्हतं. हे घर रिकामं होतं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकार्‍यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी सांगितलंय की “एकाच दिवसात अशा प्रकारे हे दुसरं बीच हाउस पडत आहे.” घर कोसळण्याच्या काही सेकंद आधी हा व्हीडीओ सुरू होतो. पुढच्या काही सेकंदात हे घर समुद्रात पडतं. सध्या हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.