तुम्ही तुमच्या पहिल्या पगाराचं काय केलं?, आयएएस अधिकाऱ्याचा नेटकऱ्यांना सवाल, उत्तरं वाचून नक्कीच प्रेरणा मिळेल…

| Updated on: May 15, 2022 | 6:04 PM

आयएएस अवनीश शरण यांचं हे ट्विट आहे. यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयएएस अवनीश शरण यांनी केलं आहे. पहिल्या पगाराचा संदर्भ देत त्यांनी हे ट्विट केलंय.

तुम्ही तुमच्या पहिल्या पगाराचं काय केलं?, आयएएस अधिकाऱ्याचा नेटकऱ्यांना सवाल, उत्तरं वाचून नक्कीच प्रेरणा मिळेल...
अवनीश शरण
Follow us on

मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरीला लागलो की आपल्या येणाऱ्या पहिल्या पगाराचं (first Salary) काय करायचं याचं नियोजन आपण आधीच करायला लागतो. पहिल्या पगाराची उत्सुकता आणि त्यातून काय केलं याबाबत एका आयएएस अधिकाऱ्याने एक ट्विट केलं आहे. याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.आयएएस अवनीश शरण यांचं हे ट्विट आहे. यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयएएस अवनीश शरण (Awanish Sharan) यांनी केलं आहे. पहिल्या पगाराचा संदर्भ देत त्यांनी हे ट्विट केलंय. “तुम्ही तुमच्या पहिल्या पगाराचं काय केलं किंवा करणार आहात?”, त्यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपले अनुभव सांगितले आहेत.

अवनीश शरण यांचं ट्विट

आयएएस अवनीश शरण यांचं हे ट्विट आहे. यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयएएस अवनीश शरण यांनी केलं आहे. पहिल्या पगाराचा संदर्भ देत त्यांनी हे ट्विट केलंय. “तुम्ही तुमच्या पहिल्या पगाराचं काय केलं किंवा करणार आहात?”, त्यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपले अनुभव सांगितले आहेत.

अवनीश शरण यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एकाने लिहिलंय की मी माझा पहिला पगार माझ्या आई-वडिलांना समर्पित करेल. तर काहींनी सांगितलंय की गरजूंना मदत करेल.

मात्र त्याच्या या ट्विटची एका नेटकऱ्याने खिल्ली उडवली आहे. तो म्हणाला की “आयएएस होऊन काय करणार?” त्यावर उत्तरही त्यानेच दिलंय तो म्हणालाय की, उत्तर- “मोटिवेशनल ट्विट करेन.”

अश्या उत्तरानंतर अवनीश शरण यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले की, “आधी आयएएस व्हा तर खरं!” ‘आधी व्हा मग जा.’

एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “मी माझ्या पहिल्या पगारात वॉशिंग मशिन घेतलं होतं. जेणेकरून आता आईला हाताने कपडे धुवावे लागणार नाहीत.”

तर आणखी एकाने लिहिलंय, “पगाराच 2100 रुपयांचा चेक मी आईच्या हातात ठेवला होता.”

अवनीश शरण हे 2009 च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे IAS अधिकारी आहेत. सध्या ते रायपूरमध्ये तैनात आहेत. IAS अवनीश सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ट्विटरवर त्यां ट्विटरवर त्यांचे 3 लाख 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.