
राजस्थानच्या अजमेरमध्ये एका तरुणाचे लग्न थाटामाटात संपन्न झाले. त्यानंतर वधू वराच्या घरी आली. सर्व प्रथा आणि परंपरा पूर्ण केल्यानंतर हनीमूनची रात्र आली.तेव्हा वधूने वराला सांगितले आज तू मला स्पर्श करु नको, ही आमच्या खानदानाची परंपरा आहे. साध्या भोळ्या वराने असेल एखादी परंपरा म्हणून लगेच वधूचे मन राखले. परंतू सकाळ झाली तर वधूने मोठा गेम केला. झोपेतून जागे होताच वराचे सर्व स्वप्नभंग झाले. चला तर पाहूयात प्रकरण नेमके काय आहे.
वराचे नाव जितेंद्र असून त्याचे नाते एका दलालाने आग्रा येथील मुलीशी जुळवले. त्या बदल्यात या दलालाने दोन लाखांची मागणी केली होती. वराच्या कुटुंबाने ही रक्कम भरली. त्यानंतर दोघांचा जयपुरात मोठ्या थाटामाटात विवाह झाला. त्यानंतर वधूला जितेंद्र याने आपल्या किशनगड येथील घरी वाजत गाजत आणले.
सासरी वधूचे मोठ्या धूमधडाक्यात स्वागत झाले. परंतू असली खेळ तर नंतर सुरु झाला. मधूचंद्राच्या रात्री वधूने वराला सांगितले की तिला पहिल्या रात्री स्पर्श नको असल्याने एकत्र झोपू शकणार नाही. आपल्या कुटुंबाची ही परंपरा असल्याचे तिने सांगितले आणि वराला देखील ते खरे वाटल्याने त्याने लागलीच होकार दिला. त्यानंतर तिने आणखी एका परंपरेचा हवाला देत सांगितले की एक रात्र ती सासूचे दागिनेही परिधान करणार आहे. भोळ्या सासूनेही लागलीच तिचे दागिने तिला घालायला दिले. परंतू रात्रीच मोठा धक्का या सूनेने सासूला दिला.
जितेंद्र रात्री पाणी पिण्यास उठला तर त्याला वधूच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला,त्यानंतर जितेंद्र आत गेला तर तेथे कोणी नव्हते. कपाट देखील उघडे होते. त्यातील सर्व दागिनेही गायब होते. जितेंद्रने आरडा ओरड केली. कुटुंबातील अन्य लोक धावत आले.त्यानंतर वधूचा शोध सुरु केला. परंतू ती काही सापडली नाही. तेव्हा त्यांना कळाले की ती पळून गेली.
नंतर रडत रडत वर पोलिस ठाण्यात पोहचला. त्याने वधूच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कुटुंबाने दुसऱ्या दिवशी मदनगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्याची बाजू ऐकून त्यानंतर सविस्तर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणात वधू आणि दलाल दोघांचा शोध सुरु केला आहे. सध्या दोघेही फरार आहेत.