AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघींच्या प्रेमानं ‘भारत-पाकिस्तान’मधील दरीही केली पार; इश्कवाला लव्हने सोशल मीडियावरही प्रेम ओसंडून वाहू लागलं

पाकिस्तान आणि भारतातील असलेल्या या मुलींनी प्रेमामुळेच आता या दोघींनी लग्न केले आहे. त्यामुळेच भारतातील बियांका मायली आणि पाकिस्तानमधील सायमा अहमदी यांची लव्हस्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दोघींच्या प्रेमानं 'भारत-पाकिस्तान'मधील दरीही केली पार; इश्कवाला लव्हने सोशल मीडियावरही प्रेम ओसंडून वाहू लागलं
| Updated on: Jul 23, 2022 | 10:43 AM
Share

मुंबईः बियांका आणि सायमाने (Bianca and Saima) 2019 मध्ये अमेरिकेमध्ये लग्न (Marriage) केले होते, केवळ देशच नाही तर या दोन्ही मुलींचा धर्मही एकमेकांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळं या दोघींनी लग्न केल्यावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) या दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनात एकमेकांबद्दल वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आहेत. कोणाच्या मनात वेदना आहे तर कुठे राग आहे, तर कुठे  प्रेमाने ओथंबून राहलेली मनं आहेत. त्याच या दोन देशातील दोन मुलींच्या आयुष्यातील गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by ?? ???? ?? ???? ???? (@biancamaieli)

ज्या देशांचे एकमेकांशी संबंध जराही चांगले नाहीत तरीह या दोन्ही देशातील दोन मुली आहेत, ज्या एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत, त्या दोघी एकमेकींवर इतकं प्रेम करतात की, त्यांच्या प्रत्येकीची कथा ही सगळ्यांच्या तोंडी आहे.

बियांका आणि सायमाची लव्हस्टोरी

पाकिस्तान आणि भारतातील असलेल्या या मुलींनी प्रेमामुळेच आता या दोघींनी लग्न केले आहे. त्यामुळेच भारतातील बियांका मायली आणि पाकिस्तानमधील सायमा अहमदी यांची लव्हस्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बियांका आणि सायमा यांचे 2019 मध्ये अमेरिकेत लग्न केले आहे, केवळ देशच नाही तर दोन्ही मुलींचा धर्मही एकमेकींपेक्षा वेगळा आहे. बियांका ख्रिश्चन आणि तिची जोडीदार सायमा मुस्लिम आहे. या वेगवेगळ्या धर्मामुळेच या दोघींचं लग्न प्रत्येकाच्या चर्चेचा भाग बनलं आहे.

पाच वर्षे एकमेकांना डेट केले

बियांका ही कोलंबियन-भारतीय आहे खरं तर 2014 सालची गोष्ट आहे. अमेरिकेत एक घटना घडली होती, त्यावेळी एका कार्यक्रमाप्रसंगी बियांका सायमाला भेटली. त्यानंतर 2014 पासून दोघेही एकमेकांना डेट करू लागल्या. 2014 पासून त्यांनी एकमेकींना सलग पाच वर्षे डेट केले आणि नंतर 2019 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये लग्नही केले. जेव्हा बियांका आणि सायमाचे लग्न झाले तेव्हा त्यांची कहाणी आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

मुलींच्या कुटुंबीयांच्या संमतीने विवाह

त्यावेळी त्यांच्या लग्नातील त्यांच्या ड्रेसेचेही खूप कौतुक झाले होते, बियांकाने साडी नेसलेली दिसली होती, तर सायमाने या खास प्रसंगी काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. एवढेच नाही तर लग्नाच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली होती. दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांच्या संमतीने हा विवाह पार पडला होता. दोन्हीकडील पालकांनी एकमेकांना भेटून या लग्नाचा आनंद जल्लोषात साजरा केला होता. शेवटी, बियांका आणि सायमा यांनी एकमेकांना अंगठी घातली आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचनही घेतले होते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.