#LataMangeshkar : Nightingale Forever म्हणत देशभरातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, Social Media यूझर्स शोकाकूल

| Updated on: Feb 06, 2022 | 11:30 AM

Lata Mangeshkar Nidhan : लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानं देशभरात शोककळा पसरलीय. सोशल मीडियावर Lata Mangeshkar Nidhan, लता मंगेशकर, Nightingale of India, भारतरत्न, ओम शांती, Queen of Melody, END OF AN ERA, Swar Kokila असे हॅशटॅग्स ट्रेंड होत आहेत.

#LataMangeshkar : Nightingale Forever म्हणत देशभरातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, Social Media यूझर्स शोकाकूल
लता मंगेशकर यांना सोशल मीडियातून आदरांजली
Follow us on

Lata Mangeshkar Nidhan : लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानं देशभरात शोककळा पसरली आहे. आधी कोरोना आणि नंतर न्यूमोनियाशी झुंज देत असताना त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर आयसीयूत उपचारही सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती, मात्र आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे हॅशटॅग ट्रेंड होताहेत. Lata Mangeshkar Nidhan, लता मंगेशकर, Nightingale of India, भारतरत्न, ओम शांती, Queen of Melody, END OF AN ERA, Swar Kokila असे विविध हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. आता त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशासह जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे चाहते आपापल्या पद्धतीने शोक व्यक्त करत आहेत. एक नजर टाकूया काही निवडक ट्वीट्सवर…

‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’

लता मंगेशकर यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’, ‘सूर सम्राज्ञी’ अशा अनेक नावांनी संबोधलं जात असे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायिकांपैकी एक, लता मंगेशकर यांनी 1942साली त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा त्यांचं वय अवघं 13 वर्षे होतं. त्यांनी आत्तापर्यंत 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत आणि जगात एक वेगळी छाप सोडली आहे.

#लतामंगेशकर : मी शब्दांच्या पलिकडे व्यथित, लतादीदींच्या जाण्यानं झालेली पोकळी भरून न येणारी; मोदींकडून श्रद्धांजली

Lata Mangeshkar | मी नि:शब्द, लतादीदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झालीय; मोदी, राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली