VIDEO : वरमाला घालताना नवरदेवाने दिली वेगळीच पोज! व्हिडिओवर हजारो तरुणी फिदा…

VIDEO : वरमाला घालताना नवरदेवाने दिली वेगळीच पोज! व्हिडिओवर हजारो तरुणी फिदा...
वरमाला

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडिओला खूप पसंती दिली जाते. कधी लग्नामधील एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो, तर कधी नववधूच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या एका लग्नाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 24, 2021 | 12:34 PM

मुंबई : सोशल मीडियावर लग्नाचे (Wedding) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडिओला खूप पसंती दिली जाते. कधी लग्नामधील एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो, तर कधी नववधूच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या एका लग्नाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वरमालेचा व्हिडीओ व्हायरल

वरमालाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला ही भारी वाटेल आणि समजेल की, हा नवरदेव आपल्या होणाऱ्या बायकोवर किती जास्त प्रेम करतो. मात्र, बरेच लोक हा व्हिडीओ बघितल्यानंतर पोट धरून हसण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीयेत. नवरदेव-नवरीव्यतिरिक्त कुटुंबातील सदस्य आणि काही मित्रमंडळीही स्टेजवर उभे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by It Is A Girl Thing (@itisagirlthing_)

नवरीला नवरदेवाला पुष्पहार घालायचा होता. मात्र, त्याचवेळी नवरदेवाचे काही मित्र त्याला खाली पायावर बसण्यास सांगतात. विशेष म्हणजे नवरदेव खाली बसतो आणि नवरी त्याला पुष्पहार घालते. हा वरमालेचा व्हिडीओ अनेकांनी लाइक केला आहे. मात्र, काही युजर्सने हा व्हिडीओ बघितल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लग्नाच्या पवित्र विधीची खिल्ली उडवली जात आहे. तर बऱ्याच लोकांनी या नवरदेवाचे काैतुकही केले आहे.

नवरदेवाचे काैतुक केले जाते आहे

एका यूजर्सने कमेंट करताना लिहिले की, वरमालेची ही मजाक आहे, हा एक पवित्र विधी आहे. त्याचवेळी आणखी एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, मुलींनाही हे करणे आवडते.
मात्र, बऱ्याच लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. एका युजर्सचे कमेंट करताना लिहिले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माझ्या बहिणीच्या लग्नाची आठवण झाली. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी वधू-वरांची वेगवेगळ्या प्रकारे काैतुक केली आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : तेरी मिट्टी में मिल जावा… हाती तिरंगा घेत तिनं देशभक्ती जागवली, विदेशातही लोकांनी डोक्यावर घेतलं.. नेटकरी म्हणाले तुम्ही देशाचा अभिमान

Video : महिलेची पर्स चोरून पळत होता, एक पठ्ठ्यानं पकडून कसा तुडवला बघा…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें