बहिणीच्या लग्नात 22 वर्षीय युवतीचा 3 मिनिटे जबरदस्त डान्स, नंतर स्टेजवर ह्रदयविकाराचा झटका, व्हिडिओ आला समोर

Viral Video: परिणीता खाली पडल्यानंतर लोकांना धक्का बसला. सुरुवातीला लोकांना हा तिचा डान्स परफॉर्मन्स वाटला पण काही वेळातच लग्नाला उपस्थित असलेले लोक स्टेजवर धावले. तोपर्यंत परिणिताचा मृत्यू झाला होता.

बहिणीच्या लग्नात 22 वर्षीय युवतीचा 3 मिनिटे जबरदस्त डान्स, नंतर स्टेजवर ह्रदयविकाराचा झटका, व्हिडिओ आला समोर
परिणीता जैन
| Updated on: Feb 11, 2025 | 2:50 PM

Viral Video: मध्य प्रदेशातून धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही प्रश्न पडले की, मृत्यू असाही येऊ शकतो? बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स करणाऱ्या 22 वर्षीय युवतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डान्स करताना ती स्टेजवर पडली. काय घडले कोणालाच समजले नाही. त्यानंतर धावपळ उडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु ह्रदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यू झालेल्या युवतीचे नाव परिणीता जैन आहे.

विदिशा जिल्ह्यातील मगधम रिसॉर्टमध्ये लग्न समारंभातील संगीत रजनीचा कार्यक्रम सुरु होता. या लग्नासाठी इंदूरवरुन परिणीता जैन आली होती. त्याच्या सावत्र बहिणीचे लग्न होते. त्या लग्नासाठी तिने एक गाण्यावर नृत्यू बसवले होते. संगीत रजनीत तिचे नृत्य सुरु झाले. तिने केलेल्या दमदार नृत्यामुळे टाळ्या वाजू लागल्या. तीन मिनिटे तिचे हे नृत्य सुरु होते. परंतु त्यानंतर ती डान्स करताना अचानक खाली पडली. काय झाले ते लोकांनाही समजले नाही. क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने व्यासपीठावरच तिचा मृत्यू झाला होता.

डॉक्टरांनी सांगितले कारण…

परिणीता खाली पडल्यानंतर लोकांना धक्का बसला. सुरुवातीला लोकांना हा तिचा डान्स परफॉर्मन्स वाटला पण काही वेळातच लग्नाला उपस्थित असलेले लोक स्टेजवर धावले. तोपर्यंत परिणिताचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ह्रदयविकारच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

कोणताही आजार नव्हता…

लग्न समारंभात स्टेजवर डान्स करताना युवती अचानक पडली. तिने सुमारे तीन मिनिटे डान्स केल्याचे सांगितले जात आहे. तिचा डान्स पाहून लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. नृत्य केल्यानंतर मुलगी पडली आणि बराच वेळ उठली नाही. परंतु तिचा मृत्यू झाला होता. तिला कोणताही आजार नव्हता, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. देशभरात हृदयविकाराच्या झटक्याच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मात्र, ज्या पद्धतीने या मुलीचा मृत्यू झाला तो धक्कादायक आहे.