White House Video Viral: व्हाईट हाऊसच्या आत नेमके काय ? सीक्रेट रुम्स, सोन्याने मढवलेल्या भिंती, ट्रम्प यांच्या नातीचा व्हिडीओ व्हायरल

जगाचा सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेचे सर्वाच्च शक्तीशाली निवासस्थान म्हटले जाणाऱ्या व्हाईट हाऊसच्या आतील नजारा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नात Kai Trump हीने पहिल्यांदाच जगासमोर आणला आहे.

White House Video Viral: व्हाईट हाऊसच्या आत नेमके काय ? सीक्रेट रुम्स, सोन्याने मढवलेल्या भिंती, ट्रम्प यांच्या नातीचा व्हिडीओ व्हायरल
inside the white house
| Updated on: Jun 29, 2026 | 6:50 PM

White House Secret Room Video Viral: जगातील सर्वात शक्तीमान असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांचे निवासस्थान व्हाईट हाऊस संदर्भात सर्व जगाला उत्सुकता आहे. ट्रम्प यांची नात काय ट्रम्प (Kai Trump) सध्या सोशल मीडियावर झळकत असते. तिने एका नव्या व्हिडीओ लॉगमध्ये जगातील ताकदवान असलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसचा नजारा जनतेला प्रथमच दाखवला आहे. या व्हिडीओत तिने व्हाईट हाऊसची (White House) अनेक गुपिते उघड केली आहे. यातील गुप्त आणि आलिशान भाग दाखवले आहेत. खास करुन त्यातील एका रुमला तर अक्षरश: सोन्याने मढवलेले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत डोनाल्ड ट्रम्प यांची नात जेव्हा व्हाईट हाऊसच्या सर्वात खास रुम्स म्हणजे ओव्हल ऑफीसला (Oval Office) भेट देते,तेव्हा आतील नजारा पाहून तुमचे डोळे दीपून जातील. चारीही बाजूंनी यात सोनेच दिसत आहे. सोनेरी रंग आणि खरे सोने देखील यात आहे. तिने सांगितले की तिच्या आजोबांना गोल्ड खूप आवडते म्हणून त्यांनी या रुममध्ये सोने वापरुन मढवलेले आहे. या रुमच्या भिंतींवरील प्रत्येक वस्तू गोल्डने तयार झालेली आहे. एवढेच काय तर ट्रम्प यांच्या डेस्कवरील ट्रे , पेन आणि कोस्टर्स देखील सोन्याचे आहेत.

ट्रम्प यांच्या मेजावरील ‘डायट कोक’ बटण

या व्लॉगमध्ये ट्रम्प यांच्या नातीने टेबलावरील एक अनोखे बटण देखील दाखवले. ज्याला डाएट कोक बटण म्हटले जाते. तिने सांगितले की या बटणाला दाबताच राष्ट्राध्यक्षांसाठी लगेच डाएट कोक येते. याशिवाय या रुमच्या आत अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या तसबिरी आणि अनेक मेडल आणि ऐतिहासिक पेटिंग्स आहेत.

व्हाईट हाऊसमध्ये जिम ते बॉलिंग एली

व्हाईट हाऊसच्या टुरममध्ये अनेक बंदी असलेल्या सीक्रेट विभागांना देखील तिने जगासमोर आणले आहे. त्यांनी या व्हिडीओत अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा बेडरुम दाखवला आहे. तिने ग्राऊंड फ्लोअर ते दुसऱ्या मजल्याचा नजारा दाखवला आहे. यात लाल भिंतीचा रेड रुम आणि निळ्या रंगाचा ब्ल्यू रुम देखील सामील आहे. व्हाईट हाऊसच्या आत असलेली जिम, प्रायव्हेट ड्रेसिंग रुम, बॉलिंग एली आणि एक शानदार गोल्फ सिम्युलेटर देखील दाखवली आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

सोशल मीडियावर चर्चा

काई ट्रम्प यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. आणि लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या व्हाईट हाऊसची भव्यता आणि आलिशान लाईफस्टाईल पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. तर काहींनी टीका करताना हे एक सरकारी आणि ऐतिहासिक वारसा आहे. ही मालमत्ता जनतेची आहे.या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी आतील भागांना सोशल मीडियावर टाकणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

Follow Us