खरंच! कुत्रा चक्क माणसासारखा बोलू लागला तर… व्हिडिओतील ‘या’ करामती पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हिडिओमधील कुत्रा त्याच्या मालकिणीशी गोड संवाद साधतोय. त्याचा संवाद ऐकून भारावून गेलेली मालकीण त्या कुत्र्याला तितक्याच प्रेमाने गोंजारत आहे.

खरंच! कुत्रा चक्क माणसासारखा बोलू लागला तर... व्हिडिओतील या करामती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
कुत्रा आणि मालकिणीचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: News 18
| Updated on: Oct 17, 2022 | 10:03 PM

कधी कुत्रा बोलताना पाहिले का? एकतर कुत्रा मालकाच्या हातापायाशी जिभेने चाटत प्रेम व्यक्त करतो किंवा अनेकदा कुत्रा आपल्या इमानदारीचे दर्शन घडवत असतो. त्यामुळे कुत्रा पाळणारे लोक त्या इमानदार कुत्र्याच्या प्रेमात पडतात. आजपर्यंत तुम्ही अशा इमानदार कुत्र्याचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. पण सध्या व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओतील बोलका कुत्रा (Talking dog) त्याच्या मालकिणीशी कसा संवाद साधतोय? तसेच त्याच्या इतर करामती पाहून तुम्हाला आश्चर्याचा (Surprise) धक्का नक्कीच बसेल.

सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणारे व्हिडिओ हे शक्यतो प्राण्यांचे असतात. मग ते पाळीव प्राण्यांच्या असोत किंवा रानटी प्राण्यांचे. इंटरनेटवर सर्फिंग करणारे लोक प्राण्यांचे व्हिडिओ दिसताच क्षणी तिथे थांबतातच आणि त्या व्हिडिओचा आनंद घेऊनच पुढे जातात.

सध्या हीच कमाल बोलक्या कुत्र्याच्या व्हिडिओच्या बाबतीत दिसून येत आहे. केवळ तो कुत्रा वास्तव्य करत असलेल्या परिसरातील नव्हे, तर विविध राज्यांतील लोक व्हिडिओवर कमेंट्स करून बोलक्या कुत्र्याचे कौतुक करत आहेत.

कुत्रा आणि मालकिणीचा संवाद

व्हिडिओमधील कुत्रा त्याच्या मालकिणीशी गोड संवाद साधतोय. त्याचा संवाद ऐकून भारावून गेलेली मालकीण त्या कुत्र्याला तितक्याच प्रेमाने गोंजारत आहे. कुत्रा भुंकण्याऐवजी बोलतोय, त्याची ही अनोखी प्रतिभा पाहून सोशल मीडियातील युजर्स थक्क झाले आहेत.

कुत्रा आणि मालकीण दोघे एका उद्यानामध्ये उभे आहेत. जणू दोघे लाइफ पार्टनर असल्यासारखा त्यांचा रोमँटिक मूड देखील दिसत आहे. कुत्रा मालकिणीला प्रेमाने ‘हॅलो’ बोलतोय, त्यावर मालकिणीची रिअॅक्शन देखील तितकीच प्रेमळ आहे.

दोघांचा संवाद ऐकून त्यावेळी उद्यानात फेरफटका मारायला आलेल्या लोकांना किती मोठ्या आश्चर्याचा धक्का बसला असेल, याची कल्पनाही काही सोशल मीडियात युजर्स करू लागले आहेत.

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवरील कमेंट्सवरून बोलक्या कुत्र्यावरील लोकांच्या वाढत्या प्रेमाची प्रचिती आली आहे.

2050 पर्यंत सगळेच कुत्रे बोलू लागतील!

व्हिडिओमधील कुत्र्याच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द ऐकून सोशल मीडिया युजर्सच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काही युजरने अत्यंत मजेशीर कमेंट्स पोस्ट केल्या आहेत. 2050 पर्यंत सगळेच कुत्रे माणसासारखे अस्खलित बोलू लागतील, असा अंदाज एका युजरने लावला आहे.

लोक वारंवार हा व्हिडिओ पाहत आहेत. काहींनी तर आपल्या पाळीव कुत्र्यावरही असा प्रयोग सुरू केला आहे.