AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Tiger Day: तुम्हाला घरात वाघ पाळायचाय; ‘या’ कायदेशीर अटी पूर्ण करण्याची गरज

International Tiger Day | तुम्हाला वाघाचा लहान बछडा कुठे आढळला असेल, तुम्ही बरेच दिवस त्याचा सांभाळ केला असेल आणि तुम्ही पुढेही त्याचा सांभाळ करू इच्छित असाल तर तुम्ही परवानगीसाठी अर्ज करु शकता.

International Tiger Day: तुम्हाला घरात वाघ पाळायचाय; 'या' कायदेशीर अटी पूर्ण करण्याची गरज
जगभरात 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 29, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई: जगभरात 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात वाघांची संख्या वाढावी आणि त्यांच्या संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी वेगवेगळ उपक्रम राबवले जातात. सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये वाघाची (Tiger) प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत International Tiger Day सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने व्याघ्र संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.

यानिमित्ताने सोशल मीडिया आणि अन्य व्यासपीठांवरुन अनेकांकडून मजेशीर प्रश्नही उपस्थित केले जातात. भारतात वाघ घरात पाळता येऊ शकतो का, असा प्रश्न अनेकजण विचारतात. त्यादृष्टीने कायदेशीर बाबींकडे नजर टाकल्यास काही रंजक गोष्टी समोर येतात.

काय आहेत अटी?

भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वाघ पाळण्यासाठी कायदेशीर मंजुरी दिली जात नाही. या कायद्यातंर्गत तुम्ही कोणताही जंगली प्राणी घरात ठेवू शकत नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही वाघ पाळायचा ठरवलाच तर तुम्हाला सर्वप्रथम राज्यातील मुख्य वन्यजीव संरक्षकांकडून परवानगी घ्यावी लागेल.

यासाठीही एक पूर्वअट आहे. तुम्हाला वाघाचा लहान बछडा कुठे आढळला असेल, तुम्ही बरेच दिवस त्याचा सांभाळ केला असेल आणि तुम्ही पुढेही त्याचा सांभाळ करू इच्छित असाल तर तुम्ही परवानगीसाठी अर्ज करु शकता.

अपवादात्मक परिस्थितीत तुम्हाला वाघ सांभाळायची परवानगी मिळालीच तरी त्यासाठी तुम्हाला वाघाच्या सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतील. त्याच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करणे बंधनकारक असेल. उद्या एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल. भूकंप झाला किंवा वाघ घरातून पळून गेला, त्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा जीव घेतला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तसेच तुम्हाला वाघ का पाळायचा आहे, याचे सबळ कारण तुम्हाला सांगता आले पाहिजे. अन्यथा तुमची मागणी वनखात्याकडून फेटाळली जाईल.

कोणत्या देशांमध्ये वाघ पाळण्यास मंजुरी?

2015 साली मध्य प्रदेशातील तत्कालीन पशुपालनमंत्री कुसुम मेहडेल यांनी वनखात्याकडे एक प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये नागरिकांना वाघ घरी पाळण्याची परवानगी मिळावी, असे म्हटले होते. यामुळे व्याघ्र संवर्धनाला चालना मिळेल, असा दावा कुसुम मेहडेल यांनी केला होता. थायलंडसह अनेक आशियाई देशांमध्ये वाघ पाळण्यास कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे या देशांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे कुसुम मेहडेल यांनी म्हटले होते.

भारतात वाघांची संख्या किती?

जगातील एकूण वाघांपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आहेत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये वाघांची संख्या 20 हजार ते 40 हजार इतकी होती. मात्र, त्यानंतरच्या काळात शिकार व अन्य कारणांमुळे वाघांची संख्या सातत्याने घटत गेली.

सध्याच्या घडीला भारतामध्ये केवळ 2,967 वाघ शिल्लक आहेत. त्यामुळे वाघाची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये व्याघ्र संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. देशातील 18 राज्यांमधील 47 व्याघ्र संवर्धन प्रकल्पांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात.

(you need to do this if you want to keep tiger as pet at your home)

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल