“असा असावा मोठा भाऊ!” व्हिडीओ बघून नेटकरी भावुक, आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ…

| Updated on: Sep 24, 2022 | 12:01 PM

मोठा भाऊ म्हणजे सर्वस्व. जबाबदारी सांभाळताना त्याला स्वतःच्या स्वप्नांचा सुद्धा बळी द्यावा लागतो. कितीही अडचणी आल्या तरी तो वडिलांप्रमाणे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतो.

असा असावा मोठा भाऊ! व्हिडीओ बघून नेटकरी भावुक, आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ...
Brother Sister Viral video
Image Credit source: Social Media
Follow us on

कुटुंबात सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणावर असेल तर ती असते मोठ्या बहीण किंवा भावावर. मोठा भाऊ म्हणजे सर्वस्व. जबाबदारी सांभाळताना त्याला स्वतःच्या स्वप्नांचा सुद्धा बळी द्यावा लागतो. कितीही अडचणी आल्या तरी तो वडिलांप्रमाणे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतो. मोठा भाऊ असणाऱ्यांना याची चांगली कल्पना आहे. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तीन भावंडं पावसाच्या पाण्यातून चालताना दिसतायत. मग पावसाचं पाणी साचलेलं बघून मोठा भाऊ असं काही करतो की ज्यामुळे तुम्हालाही तुमच्या मोठ्या भावाची किंवा मोठ्या बहिणीची आठवण येईल.

हा व्हिडीओ कुठला आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही. आयपीएस दीपांशु काब्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. व्हिडीओ पाहून लोकं भावुक होतायत.

व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तीन भावंडं आहेत. ते चालत जाताना दिसतायत. भरपूर पाऊस झालेला दिसतोय. मोठा भाऊ, एक लहान भाऊ आणि एक बहीण असे तिघे रमत गमत जाताना दिसतायत.

आता त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचंय, पण तिथे पाणी साचलेलं आहे. पाणी बघून मोठा भाऊ आपल्या बहिणीला पाठीवर घेतो. साखरेचं पोतं उचलतात तसं.

तो बहिणीला पाठीवर उचलून त्या साचलेल्या पाण्यातून घेऊन जातो आणि रस्ता ओलांडून पायरीवर उतरवतो. एकदम तसंच तो लहान भावासोबतसुद्धा करतो. त्यालाही पाठीवर घेतो आणि त्या पाण्यातून घेऊन जातो.

हा व्हिडीओ पाहिल्यावर आपल्यालाही मोठा भाऊ आठवतो. मोठा भाऊ नसणाऱ्यांना आपल्याला तो असावा असंही वाटतं.

दीपांशु काब्रा म्हणतात, “भाऊ असावा तर असा! आई वडिलांनी आपल्या संस्कारांनी एक नायाब हिरा तयार केलाय”

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर क्युट कमेंट्स करत आहेत. एका युझरने सांगितले की, केवळ एक मोठा भाऊच हे जबाबदारीचे काम करू शकतो. याशिवाय इतरही अनेक युझर्सनी वेगवेगळ्या प्रकारे या व्हिडिओचं कौतुक केलंय.