Video Viral : नोकरीपेक्षा इस्त्रीचा धंदा भारी? दिवसाला 4 हजार रुपये अन् महिन्याला लाखोंची कमाई, नेटकरी म्हणाले…
इस्त्रीच्या व्यवसायातून महिन्याला लाखोंची उलाढाल होत असल्याचा अरुणचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याच्या सांगण्यानुसार, महिन्याची कमाई आणि खर्चाचा हिशोब सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दूधवाला, पेपरवाला आणि इस्त्रीवाला सकाळी सकाळी यांचे मुखदर्शन झाल्याशिवाय सकाळ झाल्यासारखी काय वाटत नाय. चार पैसे मिळवण्यासाठी किती मेहनत करतात बिचारे असं आपल्याला वाटत असतं.पण खरचं कधी विचार केलाय या लोकांची महिन्याची कमाई किती असेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या इस्त्रीवाल्याने त्याची महिन्याची लाखोंची कमाई सांगितली. ती ऐकून तुम्हालाही उद्यापासून इस्त्रीचा धंदा टाकल्याशिवाय राहवणार नाही.
अरूण नावाच्या या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कामाची माहिती दिली आहे. अरूण रोज तब्बल 500 कपड्यांना इस्त्री करतो. एका कपड्यामागे तो 8 रूपये घेतो. आता जरा हिशोब करा… दिवसाला 500 कपडे आणि प्रत्येक कपड्याचे 8 रूपये म्हणजे दिवसाला 4 हजार रूपये. मग महिन्याभरात हि कमाई जवळपास 1 लाख 80 हजार रूपयांपर्यंत जाते. असं अरूणने सांगितलं.
पण थांबा, ही सगळी रक्कम म्हणजे त्याचा नफा नाही तर त्यात काम करताना अनेक खर्चही आहेतच. अरूण एकटाच काम करत नाही त्याने यासाठी दोन कामगारही ठेवले आहे. त्यांना महिन्याला तो 20 हजार पगार देतो. ते सगळे वजा केल्यानंतर, महिन्याला जवळपास 80 ते 90 हजार रूपये त्याच्या हातात राहतात. आपण दिवसभर नोकरी करूनही एवढे पैसे बाजूला काढू शकत नाही आणि इकडे इस्त्रीच्या कामातून इतकी कमाई होतेय.
View this post on Instagram
पण या कामाला मेहनतही तेवढचं असल्याचं अरूणने सांगितलं आहे. तो म्हणतो की जवळपास 5 किलो वजनाच्या जड इस्त्रीने दिवसभर कपडे इस्त्री करणं सोपं नाही.सतत उभ राहून काम करणं, एवढ्या कपड्यांचा ढिग वेळेत पूर्ण करणं हे काही एका दिवसात जमणार काम नाही यासाठी मेहनत, अनुभव आणि कामाचं नियोजन लागते.
सोशल मीडियावर सध्या या अरूणचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हणतंय सांगू नको भाऊ नजर लागेल तर कोणी म्हणतंय सांगू नको सरकार तुला टॅक्स लावेल. अरूणचा हा व्हिडिओ ऐकूण एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते. आपण अनेकदा कामावरून माणसाची कमाई ठरवतो. ऑफिसमध्ये बसून काम करणारा चांगले पैसे कमावतो आणि रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्यांची कमाई कमी असते. पण जे दिसतं तसं नसतं.
