ईशा अंबानी, राधिका मर्चंट की श्लोका मेहता; अंबानी कुटुंबात कोणाचे शिक्षण जास्त?

Ambani Family Education: मुकेश अंबानी यांची मुलगी आणि दोन्ही सूना या सर्व उच्च शिक्षित आहेत. पण कोणाची डिग्री इतरांच्या तुलनेत जास्त तगडी आहे? चला, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

ईशा अंबानी, राधिका मर्चंट की श्लोका मेहता; अंबानी कुटुंबात कोणाचे शिक्षण जास्त?
Ambani Family
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 21, 2025 | 5:06 PM

भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. विशेषतः त्यांची सून आणि मुलीची जीवनशैली, शिक्षण आणि करिअरबाबत लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. अंबानी कुटुंबातील दोन्ही सूना, श्लोका मेहता आणि राधिका मर्चेंट तसेच त्यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या शिक्षणाबाबतही बरेच चर्चा होते. या तिघींनी देश-विदेशातील प्रसिद्ध विद्यापीठांमधून शिक्षण पूर्ण केले आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. आता प्रश्न असा आहे की, यापैकी कोणाकडे सर्वात प्रभावी डिग्री आहे आणि कोणाचे शिक्षण इतरांपेक्षा जास्त आहे? चला, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

श्लोका मेहता आणि राधिका मर्चेंट यांचे शिक्षण

श्लोका मेहता, जी आकाश अंबानीची पत्नी आहे, तिने आपले शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायदा आणि राजकारण यांचा अभ्यास करण्यासाठी गेली. तिची गणना अभ्यासात हुशार विद्यार्थ्यांमध्ये होते आणि ती सामाजिक कामाशी जोडलेली आहे.

वाचा: चौघुले जरा इकडे या… भर विमानात मुख्यमंत्री फडणवीसांनी आवाज दिला अन्…

दुसरीकडे, अनंत अंबानीची पत्नी राधिका मर्चेंटच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिनेही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. तिची शैक्षणिक पार्श्वभूमीही खूप मजबूत मानली जाते. तीही व्यवसाय आणि संशोधनाशी संबंधित उपक्रमांमध्ये रस घेते.

ईशा अंबानीचे शिक्षण

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकमेव मुलगी ईशा अंबानीच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तीही शिक्षणात कोणापेक्षा कमी नाही. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आणि नंतर अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीमधून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई अभ्यासात पदवी मिळवली. त्यानंतर तिने स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची डिग्री घेतली आहे.

व्यवसाय व्यवस्थापनात एमबीए केल्यानंतर ईशाने थेट रिलायन्सच्या मोठ्या जबाबदाऱ्या हाताळायला सुरुवात केली. सध्या ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तसेच ती रिलायन्स जियो आणि जियो फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या बोर्डातही सामील आहे.