VIDEO : ‘जेसीबी की खुदाई’नंतर जेसीबीचा नवा व्हिडीओ, थेट बीचवर तरुणाला डिवचणारा जेसीबी, भन्नाट व्हिडीओ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 06, 2021 | 6:57 PM

जेसीबीच्या व्हायरल होणाऱ्या नव्या व्हिडीओत भन्नाट सस्पेन्स आहे. एक तरुण बीचवर मस्तपैकी झोपला आहे. त्याला कदाचित जेसीबी चालकाने तिथून उठायला सांगितलं असावं. पण तो उठला नाही.

VIDEO : 'जेसीबी की खुदाई'नंतर जेसीबीचा नवा व्हिडीओ, थेट बीचवर तरुणाला डिवचणारा जेसीबी, भन्नाट व्हिडीओ
'जेसीबी की खुदाई'नंतर जेसीबीचा नवा व्हिडीओ, थेट बीचवर तरुणाला डिवचणारा जेसीबी

मुंबई :जेसीबी की खुदाई’ हा ट्रेंड आपल्याला माहिती आहे. अभिनेत्री सनी लिओनी हिने जेसीबीसोबत फोटो टाकला आणि नंतर सोशल मीडियावर या ट्रेंड संबंधित पोस्टचा प्रचंड भडीमार बघायला मिळाला होता. लोक खूप भन्नाट व्हिडीओ आणि मिम्स शेअर करायचे. त्या ट्रेंडमधून लोकांना जेसीबीचं खूप अप्रूप वाटतं, असं जाणायचं. सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या लोकांचं जेसीबीवरील प्रेम अजूनही तितकंच आहे. कारण जेसीबी संबंधित आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

नव्या व्हिडीओत नेमकं काय?

जेसीबीच्या व्हायरल होणाऱ्या नव्या व्हिडीओत भन्नाट सस्पेन्स आहे. एक तरुण बीचवर मस्तपैकी झोपला आहे. त्याला कदाचित जेसीबी चालकाने तिथून उठायला सांगितलं असावं. पण तो उठला नाही. त्यामुळे रागावलेल्या जेसीबी चालकाने समुद्राचं पाणी जेसीबीत भरुन सावकाशपणे मुलाजवळ येऊन त्यांच्या अंगावर विसर्जित केलं. यावेळी तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली. नेमकं काय झालंय ते त्याला समजलंच नाही. तो तातडीने तिथून उठतो आणि पळ काढतो. यामध्ये तो तरुण पूर्णपणे भिजतो.

संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद

विशेष म्हणजे हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ कदाचित ठरवून तयार केल्याचा अंदाज आहे. व्हिडीओवर हास्याचे इमोजी देखील आहेत. पण या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळताना दिसत आहेत.

युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hepgul5 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. संबंधित व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर अवघ्या काही क्षणात 1600 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. तसेच काही युजर्सनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पण अनेकांनी इमोजी टाकत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी एका युजरने लहानपणाची आठवण आली, असं म्हटलं आहे.

व्हिडीओ बघा :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

मुलीचा अफलातून स्टंटचा व्हिडीओ व्हायरल

दुसरीकडे सोशल मीडियावर एका मुलीच्या अफलातून स्टंटचा व्हिडीओदेखील प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे जगात टॅलेंटेड मुलांची कमतरता नाही. अनेक टॅलेंटेड मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. यापैकी काही हटके व्हिडीओ आहेत, तर काही इतके कमाल आणि आश्चर्यकारक आहेत की त्यावरुन नजर हटत नाही. गेल्या काही दिवसांपासून एका मुलीच्या जबरदस्त स्टंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकजण म्हणेल की या मुलीचे शरीर आहे की रबर. रबरासारखी लवचिकता असलेली मुलगी आश्चर्यकारक स्टंट दाखवत आहे. व्हायरल झालेला हा स्टंट व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी एका छोट्या रेलिंगवाल्या पुलावर जिम्नॅस्टसारखे स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका प्रशिक्षण सत्रादरम्यान काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुलीच्या लवचिक शरीराकडे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हा स्टंट करण्यापूर्वी तिने किती सराव केला असेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

VIDEO : डीजेवाल्या नवरीचा नाद खुळा, भन्नाट गाण्यांवर वऱ्हाडींना नाचवलं

केरळचा ऑटो ड्रायव्हर सोशल मीडियावर रातोरात फेमस, असे नेमके काय झाले पाहा तुम्हीच!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI