केरळचा ऑटो ड्रायव्हर सोशल मीडियावर रातोरात फेमस, असे नेमके काय झाले पाहा तुम्हीच!

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वत्र व्हायरल होते. तसेच  एखाद्या व्यक्ती एका रात्रीमध्ये फेमस होतो. खरं तर, सोशल मीडियावरील काही पोस्ट अत्यंत मनोरंजनात्मक असतात.

केरळचा ऑटो ड्रायव्हर सोशल मीडियावर रातोरात फेमस, असे नेमके काय झाले पाहा तुम्हीच!
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 9:55 PM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वत्र व्हायरल होते. तसेच एखादी व्यक्ती रातोरात फेमस होतो. खरं तर, सोशल मीडियावरील काही पोस्ट अत्यंत मनोरंजनात्मक असतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. (kerala autorickshaw with paulo coelho name goes viral on social media)

केरळमधील एका ऑटोवर Paulo Coelho असे लिहून खाली मल्याळममध्ये लिहिले आहे की, ‘अल्केमिस्ट’ आता या ऑटोचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रसिध्द लेखक Paulo Coelho यांनी स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “केरळ, भारत (फोटोसाठी खूप खूप धन्यवाद).” फोटोमध्ये दिसणाऱ्या ऑटोच्या नंबर प्लेटवरून दिसून येते की हा ऑटो एर्नाकुलमच्या आऱटीओ प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे.

ऑटोरिक्षा मालक केए प्रदीप ट्विटरवर सक्रिय नाहीत. पण जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्याला त्याच्या ऑटो ट्वीटबद्दल सांगितले, तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून अनेकांनी प्रदीपची स्तुती केली. एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रदीपला पुस्तके वाचण्याची आवड आहे. या छंदामुळे 55 वर्षीय प्रदीपने Paulo Coelho ची 10 पुस्तके वाचली आहेत. प्रदीप 25 वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवत आहेत.

जेव्हा प्रदिप यांच्या ऑटोचा फोटो व्हायरल झाला, तेव्हा प्रदीप हे खूप आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, “माझ्यासाठी हे खूप मोठे आश्चर्य होते. माझ्या आवडत्या लेखकाने माझ्या ऑटोरिक्षाबद्दल ट्विट केले हे जाणून मला खूप आनंद झाला आहे. ”तसेच, त्यांनी Paulo Coelho यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली.!

Paulo Coelho हे सध्या सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक आहेत, त्यांची पुस्तके जगभरात प्रचंड वाचली जातात. पण प्रदीपमध्ये दिसणारी त्यांच्या पुस्तकांची क्रेझ काही वेगळीच आहे.

संबंधित बातम्या : 

गाडीच्या छतावर स्वत:ला बांधलं, 180 किमीच्या वेगाने पळवली गाडी, VIDEO पाहून फुटेल घाम!

Video | लग्नाचं टेन्शन विसरून नवरी पाणीपुरी खाण्यात बिझी!, इंटरनेटवरील चर्चित व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती…

Video | कॅमेऱ्याला पाहून नवरीचा अजब कारनामा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

(kerala autorickshaw with paulo coelho name goes viral on social media)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.