गाडीच्या छतावर स्वत:ला बांधलं, 180 किमीच्या वेगाने पळवली गाडी, VIDEO पाहून फुटेल घाम!

काहीतरी हटके करुन लोकाचं लक्ष वेधून घेणारे हे 'खतरोंकी खिलाडी' काहीही करु शकतात. अशाच एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्याने स्वत:ला वेगात धावत्या गाडीच्या छतावर बांधून घेतलं आहे.

गाडीच्या छतावर स्वत:ला बांधलं, 180 किमीच्या वेगाने पळवली गाडी, VIDEO पाहून फुटेल घाम!
Car stunt video

मॉस्को: जगभरात असे अनेकजण असतात जे तारुण्याच्या जोशात अनेक प्रकारचे धोके पत्करतात. काहीतरी हटके करुन सर्वांच लक्ष वेधून घेण्यासाठी जीवाची पर्वाही करत नाहीत. असाच एक रशियाचा तरुण (Influencer) जो वेगवेगळे व्हिडीओ बनवून लोकाचं मनोरंजन करु पाहतो त्याने एक धक्कादायक व्हिडीओ तयार केला आहे. त्याने व्हिडीओत एक खतरनाक कार स्टंट केला आहे, जो पाहून सामान्यांना अक्षरश: घाम फुटेल. पोलिसांनी त्याच्या या माथेफिरू स्टंटसाठी त्याची चौकशी सुरु केली असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

या रशियन तरुणाचं नाव डॅनिल (Danil Myasnikov) असं असून त्याच्या वेगवान कार स्टंट व्हिडीओने सर्वत्र खळबळ माजली आहे. डेनिलने एका धावत्या वेगवान गाडीच्या छतावर स्वत:ला बांधलं आणि या सर्वाचा व्हिडीओ देखील बनवला. विशेष म्हणजे या व्हिडीओ दरम्यान गाडीचा वेग प्रतिताशी 180 किमी इतका होता.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये डेनिल एका वेगवान गाडीच्या छतावर दिसत आहे. यात तो पूर्णपणे झोपला असून त्याने रश्शी आणि वस्तू चिटकवायच्या अनेक टेप्सनी स्वत:ला बांधून घेतलं आहे. त्याचा सोबती गाडी चालवत आहे. यावेळी व्हिडीओमध्ये डॅनिल आणि गाडीचा स्पीड यावर सतत कॅमेरा ठेवण्यात आला आहे. एका वेळी तर गाडीचा स्पीड थेट 180 च्या पुढे गेलेलाही दिसून येत आहे. अनेक जण हा व्हिडीओ वेगवेगळ्या अँगलने शूट करताना दिसत आहेत. एका द्रुतगती मार्गावर हा व्हिडीओ तयार केला जात आहे.

वाहतूक पोलिस डॅनिलच्या शोधात

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिस अधिकारी डॅनिलचा शोध घेत आहेत. सध्यातरी सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप अधिक प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण या व्हिडीओला शेअर करत आहेत. आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी लाईक केला आहे. कमेंट्सचाही पाहूस या व्हिडीओवर पडत असून अनेकजण अशाप्रकारचे धोकादायक स्टंट न करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

इतर बातम्या :

Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल

‘मम्मीसोबत प्रेमसंबंध ठेवतोस?’, आईच्या प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी तरुणीचा चुकीचा मार्ग, लाखोंची खंडणी

अरेच्चा! ही कासवं तर तुरुतुरु पळतायत, जमिनीवर पळणाऱ्या कासवांचा VIDEO इंटरनेटवर तुफान व्हायरल 

(Influencer did Car stunt video with taped himself on high speed cars roof see shocking video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI