अरेच्चा! ही कासवं तर तुरुतुरु पळतायत, जमिनीवर पळणाऱ्या कासवांचा VIDEO इंटरनेटवर तुफान व्हायरल 

आपल प्रत्येकानेच लहाणपणी कासव आणि सशाच्या शर्यतीची गोष्ट ऐकली आहे. त्यामुळे कासव हा कायम अगदी हळू चालणारा प्राणी म्हणूनच आपण ओळखतो. पण या व्हिडीओतील कासवं तर धावत आहेत.

अरेच्चा! ही कासवं तर तुरुतुरु पळतायत, जमिनीवर पळणाऱ्या कासवांचा VIDEO इंटरनेटवर तुफान व्हायरल 
धावणारी कासवं

मुंबई : इंटरनेटवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी सेलेब्रेटींचे, तर कधी बच्चे कंपनीचे. पण सर्वाधिक प्रेम हे प्राण्यांच्या व्हिडीओजना मिळतं. असाच एक प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात चक्क कासव हा जगातील धिम्यागतीनं चालणाऱ्या प्राण्यांपैकी एक असणारा प्राणी धावताना दिसत आहे. आपल प्रत्येकानेच लहाणपणी कासव आणि सशाच्या शर्यतीची गोष्ट ऐकली आहे. त्यामुळे कासव हा कायम अगदी हळू चालणारा प्राणी म्हणूनच आपण ओळखतो. पण या व्हिडीओतील कासवं तर धावत आहेत.

हा व्हिडीओ Wu-Tang Is For The Children या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहेय या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मला नव्हतं माहित की कासवं पळू शकतात.’ व्हिडीओमध्येही पाहू शकतो काही कासवं एका अंगणासारख्या परिसरात एका मागोमाग धावत अगदी मजेत दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पुन्हा पोस्ट केला आहे. तसेच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस या व्हिडीओवर पडत आहेय. अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया लिहित असून एका युजरने लिहिलं आहे की,‘आजच्या आधी मी असा व्हिडीओ कधीच पाहिला नव्हता, हे फार मजेशीर आहे’. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, ‘असं वाटतं आहे या कासवांनी ताकदीचं कोणतं तरी औषध खाललं आहे.’

इतर बातम्या :

Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ

Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

(Turtles running on the ground video went viral on internet)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI