Video | प्रवासासाठी विमानतळावर चक्क बिकिनीवर आली, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

सध्या मात्र एका महिलेचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये महिला विमानतळावर चक्क बिकिनी घालून आली आहे. महिलेचा हा 'एअरपोर्ट लूक' सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Video | प्रवासासाठी विमानतळावर चक्क बिकिनीवर आली, महिलेचा व्हिडीओ व्हायरल
AIRPORT VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहून आपण कधी कधी थक्क होऊन जातो. या मंचावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ पाहून नेमकी कोणती प्रतिक्रिया द्यावी ? हे आपल्याला समजत नाही. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हैराणही होतो. सध्या मात्र एका महिलेचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये महिला विमानतळावर चक्क बिकिनी घालून आली आहे. महिलेचा हा ‘एअरपोर्ट लूक’ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (women reach airport in bikini to catch flight video went viral on social media)

बिकिनी परिधान करून महिला एअरपोर्टवर आली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहताच सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडीओमध्ये एक महिला चक्क बिकिनी परिधान करून एअरपोर्टवर उतरली आहे. एवढेच नव्हे तर बिकिनी घालून ही महिला विमानाने प्रवास करणार आहे, असं वाटतंय. महिलेच्या या एअरपोर्ट लूक वर नेटकरांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

बड्या सेलिब्रिटींचे एअरपोर्टवरील फोटो किंवा व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अभिनेता, अभिनेत्री यांचे फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक अशा माध्यमांवर आवडीने शेअर केले जातात. मात्र सध्या या महिलेचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. महिलेने बिकिनी परिधान केलेली असली तरी, तिने कोरोना नियम म्हणून चेहर्‍यावर मास्क लावला आहे. तोंडाला मास्क लावून महिला बिकिनीवर आल्यामुळेदेखील नेटकरांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ

Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

(women reach airport in bikini to catch flight video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI