Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 4:41 PM

नवरीच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचल्यानंतर येथे वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला आहे. नवरीच्या वडिलांनी नवरदेवाच्या मानेवर काठी ठेवली आहे. तसेच लाडिक भाषेत नवरीचे वडील नवरदेवाला समजावून सांगत आहेत.

Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल
marriage viral video

Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरीच्या पित्याने आपल्या जावयाला हातात लाकडी काठी घेऊन समजावले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (father giving advice to son in law in marriage funny video went viral on social media)

नवरदेवाला समजावण्याची वेगळीच तऱ्हा

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंदीस उतरत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नविधी पार पडल्याचे दिसत आहे. लग्नानंतर नवरी आणि नवरदेव घरातील सदस्य तसेच नातेवाईकांचे आशीर्वाद घेत आहेत. नवरीच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचल्यानंतर मात्र येथे वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला आहे. नवरीच्या वडिलांनी नवरदेवाच्या मानेवर काठी ठेवली आहे. तसेच लाडिक भाषेत नवरीचे वडील नवरदेवाला समजावून सांगत आहेत.

नवरी भावूक, रडू कोसळले

माझी मुलगी लाडाची आहे. तिची काळजी घ्या. तिला समजून घ्या, असे नवरीचे वडील नवरदेवाला सांगताना दिसत आहे. नवरीचे वडील मानेवर काठी ठेवून बोलत असले तरी नवरदेवाला राग आलेला नाही. उलट नवरदेव शांतपणे सगळं ऐकून घेतोय. हा प्रसंग घडत असताना नवरी भावूक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नवरी तिचे डोके आपल्या वडिलांच्या डोक्यावर ठेवून रडत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले असून तो witty_wedding या अकाऊंटवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

अरेच्चा! ही कासवं तर तुरुतुरु पळतायत, जमिनीवर पळणाऱ्या कासवांचा VIDEO इंटरनेटवर तुफान व्हायरल 

VIDEO | पीपीई किटमध्ये डॉक्टरांना समजली भूत, रुग्ण महिलेचा आरडाओरडा, मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | प्रवासासाठी विमानतळावर चक्क बिकिनीवर आली, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(father giving advice to son in law in marriage funny video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI