मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. तर कधी काही व्हिडीओ पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तर आपल्याला चक्रावून सोडणारा आहे. या व्हिडीओमध्ये पावासामध्ये भिजू नये म्हणून एका बैलाने वेगळंच काहीतरी केलं आहे. हा बैल थेट घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आहे. (rajasthan bull climb on first floor of house funny video went viral on social media)