Video | लग्नाचं टेन्शन विसरून नवरी पाणीपुरी खाण्यात बिझी!, इंटरनेटवरील चर्चित व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती…

गोलगप्पे किंवा पाणीपुरी हे नाव ऐकताच लगेचच तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी-गोलगप्पा प्रेमी या कुरकुऱ्या पुऱ्या खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात आणि ते अगदी चवीचवीने खातात. पण, तुम्ही कधी वधूला तिच्या स्वतःच्या लग्नात सारं काही विसरून पाणीपुरीची चव चाखताना पाहिले आहे का?

Video | लग्नाचं टेन्शन विसरून नवरी पाणीपुरी खाण्यात बिझी!, इंटरनेटवरील चर्चित व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती...
लग्नात पाणीपुरी खाण्यात बिझी वधू

मुंबई : गोलगप्पे किंवा पाणीपुरी हे नाव ऐकताच लगेचच तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी-गोलगप्पा प्रेमी या कुरकुऱ्या पुऱ्या खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात आणि ते अगदी चवीचवीने खातात. पण, तुम्ही कधी वधूला तिच्या स्वतःच्या लग्नात सारं काही विसरून पाणीपुरीची चव चाखताना पाहिले आहे का? नसल्यास, आता एकदा पहाच! एका लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात नवरी बाई लग्नाचा सर्व तणाव विसरून गोलगप्पा खाण्यात व्यस्त झाली आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे.

आजकाल सोशल मीडियावर लग्नाच्या अशाच अनेक धमाल व्हिडीओंचा पूर आला आहे. असे व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आले आहेत आणि लोक त्यांना खूप पसंतही करत आहेत. सहसा लग्नात, नवरी तिचे कपडे, दागिने, मेकअप सावरण्यामध्ये व्यस्त असते. आणि तरीही, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या नजरा वधूवर आणि तिच्या दिसण्यावर खिळलेल्या असतात.

हटके नवरीबाईची जोरदार चर्चा

पण, ही वधू थोडी वेगळी आहे. ही ना लोक काय म्हणतील याची काळजी करते, ना तिचा मेकअप सावरण्यात वेळ दवडते. सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असलेली ही सुंदर वधू स्वतःच्याच लग्नात गोलगप्पा खाण्यात व्यस्त आहे आणि यासाठी तिला कोणाच्या मदतीचीही गरज नाही. पाणीपुरीची आवड असणारी ही वधू स्वतःची थाळी सजवून आणि गोलगप्पा बनवून स्वतःच मजेने खात आहे.

पाहा व्हिडीओ :

चर्चेत आलेली ही वधू तिच्या लग्नात सगळा ताण विसरून चक्क पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे. यासह, पार्श्वभूमीवर गाणारा गायक देखील तिखट जाळ गोलगप्पांशी संबंधित गाणी गाऊन वातावरण अधिक चैतन्यपूर्ण बनवत आहेत. असे अनेक व्हिडीओ लग्नाच्या हंगामात लोकांची पहिली पसंती बनले आहेत. हा व्हिडीओ दुल्हनिया नावाच्या अकाऊंटने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. लोक फक्त हा व्हिडीओ एकमेकांसोबत शेअर करत नाहीयत, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत. आपल्या लग्नात गोलगप्पाचा आनंद घेणारी ही नवरी बाई लोकांची मने जिंकत आहे.

इतर बातम्या :

Video | जेवताना नवरी-नवरदेवाची मस्ती, मजेदार व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Video | ऐकावं ते नवलंच ! पाऊस आला म्हणून थेट पहिल्या मजल्यावर चढला, बैलाला खाली आणण्यासाठी तारांबळ

Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI