Video | जेवताना नवरी-नवरदेवाची मस्ती, मजेदार व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाने केलली धम्माल, मस्ती पाहण्यासारखी आहे.

Video | जेवताना नवरी-नवरदेवाची मस्ती, मजेदार व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. या मंचावर नवरी-नवरदेवाचे व्हिडीओ तर आवडीने पाहिले जातात. अशा व्हिडीओंना नेटकरी उत्स्फूर्तपणे शेअरही करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवाने केलली धमाल, मस्ती पाहण्यासारखी आहे. (newly married bride and groom having fun while eating video went viral on social media)

जेवताना नवरी-नरदेवाची मस्ती

आपल्या लग्नाचा दिवस हा कायम स्मरणात राहावा म्हणून नवरी-नवरदेव वेगवेगळे फंडे वापरतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू फुटेल. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एका पापडाला घेऊन मस्ती करत आहेत. ते एकमेकांच्या ताटातील पापड एकमेकांना न मसूज देता हळूच चोरून घेऊन खात आहेत.

या व्हिडीओमध्ये नवरदेव कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. नवरदेव कॅमेऱ्याकडे पाहत असताना नवरीने त्याच्या ताटातील पापड हळूच उचलले आहे. तसेच पापड खाऊन नवरीने ते तिच्याच ताटात ठवले आहे. आपल्या ताटातील पापड गायब असल्याचे समजताच नवदेवानेही नवरीच्या ताटातील पापड हळूच उचलले आहे. जेवत असताना नवरी-ववरदेवाची ही मस्ती नेटकऱ्यांनी चांगलीच भावली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by TheWeddingWorld (@the_wedding_world)

व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स 

कॅमेऱामॅनने सांगितल्यानुसार ही जोडी आपले हावभाव बदलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ स्क्रिप्टेड वाटत आहे. मात्र, नवरी-नवरदेवाची धमाल कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्यामुळे ती अनेकांना आवडली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहे. तसेच सध्याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ the_wedding_world या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल

‘मम्मीसोबत प्रेमसंबंध ठेवतोस?’, आईच्या प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी तरुणीचा चुकीचा मार्ग, लाखोंची खंडणी

अरेच्चा! ही कासवं तर तुरुतुरु पळतायत, जमिनीवर पळणाऱ्या कासवांचा VIDEO इंटरनेटवर तुफान व्हायरल 

(newly married bride and groom having fun while eating video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI